तुळजापूरची तुळजाभवानी ही आम्हा देशपांडे कुटुंबियांची कूलस्वामिनी आहे. त्यामुळे मी सपत्निक व मुलगा, सून असे शनिवारी ( Corporate जगताला) सुट्टी म्हणून पुण्याहून तिच्या दर्शनासाठी गेलो. नवीन लग्न झालेले जोडपे व नवीन गाडी दोन्ही तिच्या पायाशी घालून आलो. तसा दिवसात ६०० किलोमीटर प्रवास व देवीच्या दर्शनासाठी ४, ४/३० तासाचा रांगेतील प्रवास हा भरपूर थकवणारा होता. पण ४/५ सेकंदांच आईचं सुंदर दर्शन झालं. काळ्या रुपातील तेजस्वी डोळ्याची आईची मुर्ती देखणी आहेच पण कणखरही. हजारो लेकर रांगेत होती. यातील कुणीही Black life matters? च्या आंदोलनात नसत कारण या सगळ्यांची आईच काळी. पण या आईच्या रंगाची ओळख नसलेल्या पेज थ्री जनतेच्या इंग्रजी आंदोलनात समाजाचा सहभाग का मिळत नाही हे ही मला समजले. या रांगेत ४/५ तास वेळच वेळ होता. तेंव्हा आईच्या आईपणाची परत ओळख झाली. या आईने आईपणाची किती झिज सोसली ते आठवले. एका गाण्याच्या चार ओळी आठवल्या. तुळजापूरची भवानी, माय मह्नमंगला, राऊळात अधम खान, दैत्यासह पोहोचला, मुर्ती भंगली, मनात चित्रगुप्त हासला, केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला. आम्हा सर्वांचे दैवत असलेले छत्रपति शिव...
Comments
Post a Comment