हिंदू सारा एक तळजाई शिबीर पर्व

हिंदू सारा एक.    तळजाई शिबीर पर्व २

या अभूतपूर्व समाज घुसळणीतील पर्वात शब्दशः हजारो कार्यकर्ते लाखो स्वयंसेवकांच्या पर्यंत पोहचले. यात हजारो गावे संपर्कित केली गेली. व ती ही फक्त महाराष्ट्रातील आणि तो महाराष्ट्र सुध्दा विदर्भ सोडून, पण गोमांतक धरून.

३५००० गणवेषधारी स्वयंसेवक गोळा केले, एवढेच घडले असते तर या शिबिराची ओळख पर्व, किंवा महाराष्ट्र सामाजिक, धार्मिक व राजकीय पुनर्रचना पटल अशी झाली नसती. पण यश व परिणाम कळले तरी सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांना, माध्यमवीरांना, एवढासा उपक्रम पण एवढे प्रचंड, हिंदू सारा एक, हे वादळ कसे करू शकला ह्याचा उलगडा होऊ शकत नव्हता. त्याची ओळख करून घेणे गरजेचे आहे. संघाची कार्यपध्दती व प्रत्येकाचा सहभाग म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे.

लाखांच्या सभा व ३५००० स्वयंसेवकांचे तीन दिवसीय शिबीर यातील तो मूलभूत फरक आहे. व म्हणून हे तळजाई शिबीर पर्व समजले पाहिजे. लाखाची सभा यशस्वी करण्यासाठी एक जननायक पुरतो. पण समाज घुसळण करण्यासाठीच्या शिबिराला यशस्वी करण्यासाठी एक जननायक नाही तर हजारो सामान्य कार्यकर्ते समर्पित ध्येयवादाने दररोज स्वयंप्रेरणेने कार्यरत असावे लागतात. हे गमक असते एक कार्यक्रम परिवर्तन पर्व बनण्यासाठी.

इंग्रजीत वर्णन करतात तसे No stone remain unturned. असे प्रत्यक्ष करावे लागते. स्वयंसेवकांनी ते केले. प्रथम पुरषी एकवचनी काम करायचे असते प्रत्येकाने. तळजाईच्या वेळी प्रत्येकाने स्वतः ची आहुती दिली. फक्त स्वतः नाही तर संपूर्ण समाजाला आपलेपणाने त्यात सहभागी करून घ्यावे लागते तेही झाले. व परिणाम स्पष्ट दिसला. उपक्रमाचे पर्व झाले.

हे प्रत्यक्ष कसे घडले ते उलगडून पाहू या पुढील लेखात.

सुनील देशपांडे
पुणे
९४२०४९५१३२.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन