तळजाई पर्व३ हिंदू सारा एक
🚩हिंदू सारा एक. 🚩 🔸तळजाई पर्व ३🔸
▪️एक साधे शिबीर पण त्या शिबीराने संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील रूळलेल्या वाटा मोडून काढल्या व संपूर्ण नवीन रचना निर्माण केल्या. हिंदू संकल्पना, हिंदू समाज, हे या सर्व क्षेत्रांच्या केंद्रस्थानी आले. म्हणून एका संस्थेचे एक शिबीर हे एका अर्थाने पर्व ठरले.
▪️या शिबीरासाठी समाज घुसळण सुमारे वर्षभर चालू होती. ३५००० संख्या प्रत्यक्ष तीन दिवस एकत्र रहात होती की महाराष्ट्रातील तत्कालीन, स्वघोषित वैचारिक नेतृत्वाला आश्चर्य करायला लावत होती. जातपात व त्यातील स्वनिर्मित संघर्ष या वैचारिक मांडणीचा बोजवारा उडालेला महाराष्ट्रातील संपूर्ण हिंदू समाजाने पाहिला व अनुभवला. या ३५००० जणांनी एकत्र येण्यासाठी लाखो लहान मोठे कार्यकर्ते जमिनीवर प्रयत्न करत होते. एक लाखाहून अधिक लोकांनी रूपये २५/ शुल्क भरून आपला भावनिक सहभाग नोंदविला होता. शिबीरातील सहभाग ज्यांना मिळणार नव्हता त्या ५०%महिला या तळजाई वरील गार हवेत तंबू शिवण्यापासून ते ३५००० लोकांना गुळाच्या पोळ्या देण्यापर्यंत सर्व कामे करत होत्या. विचाराने सुध्दा अंगावर काटा उभा रहातो कि किती पोळ्या गोळा झाल्या असतील. व या पोळ्या पुण्यातील एखाद्या जातीच्याच महिलांना शक्य तरी आहे का? महिला म्हणून सुध्दा पुण्यातील संपूर्ण हिंदू समाज एकजुटीने उभा राहिला म्हणून हे पर्व घडले.
▪️मी नगरमध्ये रा.स्व. संघाचा प्रचारक होतो. त्या जिल्ह्यातून न भूतो अशी १८०० व शहरातून ५०० तरूण या शिबीरास उपस्थित होते. नगर तालुक्यातील प्रत्येक गावाशी संपर्क झाला. आश्चर्यकारक अनुभव आले. एका गावाने तर गाव वर्गणी करून एक सदस्य शिबीरात पाठवला. म्हणून हे पर्व बनले. नगर तालुक्यातील प्रत्यक्ष शिबीरात १४ गावातील ८० संख्या होती पण संपर्क झाला काही हजार लोकांशी. प्रत्येक गावाशी. म्हणून ह्या शिबीराचे वर्णन पर्व असे करता येते.
▪️एक कार्यकर्ता सातारहून नगरच्या अफाली कंपनीत नोकरीसाठी आला व लगेचच संघ शाखेची जबाबदारी घेतली. तोवर या शिबीराची हवा आली. या तरूणाने नगर ते पुणे पळत जाण्याचे ठरवले. येथ पर्यंत ठीक होते. त्याच्या निर्णयाने नगरमध्ये युवकांमध्ये चैतन्य निर्माण झाले. पण या निर्णयातून शिबीर घटनेचे पर्व झाले ते शिरूरमध्ये घडलेल्या प्रसंगातून.
पहाटे ४ वा नगरहून पळत निघालेल्या या तरूणाला शिरूर मध्ये येई पर्यंत ८ वाजले होते. येथे सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. थंडीत एवढ्या सकाळी शिरूर तालुका स्थान नटून तयार होते. माणसांची ही गर्दी जमली होती. शिरूरच्या बोरा महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री सु ह जोशी सर स्वतः या तरूणाचे विरोचित स्वागतासाठी हजर होते. नव्हे त्यांनीच पुढाकार घेतला होता व अनेक महाविद्यालयीन तरुण तरुणी, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सरच स्वागत करणार म्हटल्यावर पुढारीही आले सर्व शिरूरला समजले कि हिंदू सारा एक ही हिंदुत्वाची लाट निर्माण करणारे शिबीर पुण्यात होत आहे. म्हणून हे पर्व झाले. तसे एक मुलगा नगर ते पुणे पळत गेला असा वैयक्तिक पराक्रम नोंदवला गेला एवढेच याचे स्वरूप न रहाता शिरूर ने दाखवून दिले कि संपूर्ण समाज सहभागी झाला कि परिवर्तन घडते. संघ स्वयंसेवक हे असे प्रत्येक संधींचे सोने करत होते. ही एक घटना नाही तर साखळीतील एक दुवा होता. सब समाज को लिए साथमें, असे म्हणत व कृति करत हे शिबीर साकार झाले म्हणून हे महाराष्ट्रातील जनजीवनासाठी पर्व ठरले.
▪️या शिबीराच्या भक्कम पाया भरणीने लाखाहून मोठे हिंदू संमेलन व संत सहभाग असा धार्मिक उपक्रम झाला. याला हजारो खेड्यातून धुंडा महाराज देगलूरकर यांच्या आवाहनाला साथ देऊन लाखो सर्व जातीय लोक हिंदू म्हणून एकत्र आले. महाराष्ट्राला दिवा स्वप्न वाटावे असे राजकीय परिवर्तन घडले. महाराष्ट्रातील कोणत्याही क्षेत्राला आता हिंदुत्व टाळता येणार नाही असा ठसठशीत शिक्का महाराष्ट्राच्या कपाळी या पर्वकाळ ठरलेल्या शिबीराने मारला.
▪️सध्या राजकीय पटलावर हिंदू शब्द, महापुरुष यांना लहान बनवण्याचे बाळबोध खेळ चालू झाले आहेत, अशा वेळी महाराष्ट्राची हिंदू ओळख निर्माण करणा-या या शिबीराने ४० वर्षे पूर्ण केल्याची आठवण काढणे आवश्यक आहे.
▪️'हिंदू सारा एक' हीच महाराष्ट्राची ओळख आहे हे तळजाई शिबीराने अधोरेखित केलेले सत्य पुन्हा उच्चरवाने उदघोषित करू या.
🔸सुनील देशपांडे🔸
पुणे
९४२०४९५१३२. ▪️मी नगरमध्ये रा.स्व. संघाचा प्रचारक होतो. त्या जिल्ह्यातून न भूतो अशी १८०० व शहरातून ५०० तरूण या शिबीरास उपस्थित होते. नगर तालुक्यातील प्रत्येक गावाशी संपर्क झाला. आश्चर्यकारक अनुभव आले. एका गावाने तर गाव वर्गणी करून एक सदस्य शिबीरात पाठवला. म्हणून हे पर्व बनले. नगर तालुक्यातील प्रत्यक्ष शिबीरात १४ गावातील ८० संख्या होती पण संपर्क झाला काही हजार लोकांशी. प्रत्येक गावाशी. म्हणून ह्या शिबीराचे वर्णन पर्व असे करता येते.
▪️एक कार्यकर्ता सातारहून नगरच्या अफाली कंपनीत नोकरीसाठी आला व लगेचच संघ शाखेची जबाबदारी घेतली. तोवर या शिबीराची हवा आली. या तरूणाने नगर ते पुणे पळत जाण्याचे ठरवले. येथ पर्यंत ठीक होते. त्याच्या निर्णयाने नगरमध्ये युवकांमध्ये चैतन्य निर्माण झाले. पण या निर्णयातून शिबीर घटनेचे पर्व झाले ते शिरूरमध्ये घडलेल्या प्रसंगातून.
पहाटे ४ वा नगरहून पळत निघालेल्या या तरूणाला शिरूर मध्ये येई पर्यंत ८ वाजले होते. येथे सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. थंडीत एवढ्या सकाळी शिरूर तालुका स्थान नटून तयार होते. माणसांची ही गर्दी जमली होती. शिरूरच्या बोरा महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री सु ह जोशी सर स्वतः या तरूणाचे विरोचित स्वागतासाठी हजर होते. नव्हे त्यांनीच पुढाकार घेतला होता व अनेक महाविद्यालयीन तरुण तरुणी, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सरच स्वागत करणार म्हटल्यावर पुढारीही आले सर्व शिरूरला समजले कि हिंदू सारा एक ही हिंदुत्वाची लाट निर्माण करणारे शिबीर पुण्यात होत आहे. म्हणून हे पर्व झाले. तसे एक मुलगा नगर ते पुणे पळत गेला असा वैयक्तिक पराक्रम नोंदवला गेला एवढेच याचे स्वरूप न रहाता शिरूर ने दाखवून दिले कि संपूर्ण समाज सहभागी झाला कि परिवर्तन घडते. संघ स्वयंसेवक हे असे प्रत्येक संधींचे सोने करत होते. ही एक घटना नाही तर साखळीतील एक दुवा होता. सब समाज को लिए साथमें, असे म्हणत व कृति करत हे शिबीर साकार झाले म्हणून हे महाराष्ट्रातील जनजीवनासाठी पर्व ठरले.
▪️या शिबीराच्या भक्कम पाया भरणीने लाखाहून मोठे हिंदू संमेलन व संत सहभाग असा धार्मिक उपक्रम झाला. याला हजारो खेड्यातून धुंडा महाराज देगलूरकर यांच्या आवाहनाला साथ देऊन लाखो सर्व जातीय लोक हिंदू म्हणून एकत्र आले. महाराष्ट्राला दिवा स्वप्न वाटावे असे राजकीय परिवर्तन घडले. महाराष्ट्रातील कोणत्याही क्षेत्राला आता हिंदुत्व टाळता येणार नाही असा ठसठशीत शिक्का महाराष्ट्राच्या कपाळी या पर्वकाळ ठरलेल्या शिबीराने मारला.
▪️सध्या राजकीय पटलावर हिंदू शब्द, महापुरुष यांना लहान बनवण्याचे बाळबोध खेळ चालू झाले आहेत, अशा वेळी महाराष्ट्राची हिंदू ओळख निर्माण करणा-या या शिबीराने ४० वर्षे पूर्ण केल्याची आठवण काढणे आवश्यक आहे.
▪️'हिंदू सारा एक' हीच महाराष्ट्राची ओळख आहे हे तळजाई शिबीराने अधोरेखित केलेले सत्य पुन्हा उच्चरवाने उदघोषित करू या.
🔸सुनील देशपांडे🔸
पुणे
९४२०४९५१३२.
▪️मी नगरमध्ये रा.स्व. संघाचा प्रचारक होतो. त्या जिल्ह्यातून न भूतो अशी १८०० व शहरातून ५०० तरूण या शिबीरास उपस्थित होते. नगर तालुक्यातील प्रत्येक गावाशी संपर्क झाला. आश्चर्यकारक अनुभव आले. एका गावाने तर गाव वर्गणी करून एक सदस्य शिबीरात पाठवला. म्हणून हे पर्व बनले. नगर तालुक्यातील प्रत्यक्ष शिबीरात १४ गावातील ८० संख्या होती पण संपर्क झाला काही हजार लोकांशी. प्रत्येक गावाशी. म्हणून ह्या शिबीराचे वर्णन पर्व असे करता येते.
▪️एक कार्यकर्ता सातारहून नगरच्या अफाली कंपनीत नोकरीसाठी आला व लगेचच संघ शाखेची जबाबदारी घेतली. तोवर या शिबीराची हवा आली. या तरूणाने नगर ते पुणे पळत जाण्याचे ठरवले. येथ पर्यंत ठीक होते. त्याच्या निर्णयाने नगरमध्ये युवकांमध्ये चैतन्य निर्माण झाले. पण या निर्णयातून शिबीर घटनेचे पर्व झाले ते शिरूरमध्ये घडलेल्या प्रसंगातून.
पहाटे ४ वा नगरहून पळत निघालेल्या या तरूणाला शिरूर मध्ये येई पर्यंत ८ वाजले होते. येथे सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. थंडीत एवढ्या सकाळी शिरूर तालुका स्थान नटून तयार होते. माणसांची ही गर्दी जमली होती. शिरूरच्या बोरा महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री सु ह जोशी सर स्वतः या तरूणाचे विरोचित स्वागतासाठी हजर होते. नव्हे त्यांनीच पुढाकार घेतला होता व अनेक महाविद्यालयीन तरुण तरुणी, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सरच स्वागत करणार म्हटल्यावर पुढारीही आले सर्व शिरूरला समजले कि हिंदू सारा एक ही हिंदुत्वाची लाट निर्माण करणारे शिबीर पुण्यात होत आहे. म्हणून हे पर्व झाले. तसे एक मुलगा नगर ते पुणे पळत गेला असा वैयक्तिक पराक्रम नोंदवला गेला एवढेच याचे स्वरूप न रहाता शिरूर ने दाखवून दिले कि संपूर्ण समाज सहभागी झाला कि परिवर्तन घडते. संघ स्वयंसेवक हे असे प्रत्येक संधींचे सोने करत होते. ही एक घटना नाही तर साखळीतील एक दुवा होता. सब समाज को लिए साथमें, असे म्हणत व कृति करत हे शिबीर साकार झाले म्हणून हे महाराष्ट्रातील जनजीवनासाठी पर्व ठरले.
▪️या शिबीराच्या भक्कम पाया भरणीने लाखाहून मोठे हिंदू संमेलन व संत सहभाग असा धार्मिक उपक्रम झाला. याला हजारो खेड्यातून धुंडा महाराज देगलूरकर यांच्या आवाहनाला साथ देऊन लाखो सर्व जातीय लोक हिंदू म्हणून एकत्र आले. महाराष्ट्राला दिवा स्वप्न वाटावे असे राजकीय परिवर्तन घडले. महाराष्ट्रातील कोणत्याही क्षेत्राला आता हिंदुत्व टाळता येणार नाही असा ठसठशीत शिक्का महाराष्ट्राच्या कपाळी या पर्वकाळ ठरलेल्या शिबीराने मारला.
▪️सध्या राजकीय पटलावर हिंदू शब्द, महापुरुष यांना लहान बनवण्याचे बाळबोध खेळ चालू झाले आहेत, अशा वेळी महाराष्ट्राची हिंदू ओळख निर्माण करणा-या या शिबीराने ४० वर्षे पूर्ण केल्याची आठवण काढणे आवश्यक आहे.
▪️'हिंदू सारा एक' हीच महाराष्ट्राची ओळख आहे हे तळजाई शिबीराने अधोरेखित केलेले सत्य पुन्हा उच्चरवाने उदघोषित करू या.
🔸सुनील देशपांडे🔸
पुणे
९४२०४९५१३२.
Comments
Post a Comment