शिवसेना व धनुष्यबाण
विशेष असे काही नाही, स्वाभाविकरित्या शिवसेना पक्ष व चिन्ह यावर ज्यांना अधिकार सांगता यायला पाहिजे होता. त्याला तो मिळाला. कायद्याने वेळ घालवून पण कायद्याचे काम केले. सर्वोच्च न्यायालयाने त्याचे व निवडणूक आयोगाने त्यांचे. या बद्दल अभिनंदन.
पण यातून आम्ही जन सामान्यांनी आनंदी व्हावे असे वाटत नाही. शिवसेना एकाही क्षणी आधुनिक नागरिक जीवन व संकेताची समर्थक नव्हती. राजकीय पक्ष असूनही कधीही राजकीय भूमिका नव्हती. ज्या आर्थिक सामाजिक संरचनांच्या आधाराने सरकार चालतं त्या समजून घ्यायची इच्छा नव्हती व त्या रचनांची ताकदही माहिती नव्हती. व हा दोष उध्दव ठाकरे यांचाच फक्त नव्हता तर त्या पक्ष मानसिकतेचा व त्याच्या निर्मात्या पासून सर्वांचाच होता.
फक्त हिंदुत्व हे दुकान जे एक आमली ताब्यात होते, त्याचा ताबा अता दुस-या कडे गेला आहे व तेवढे पुण्याचे अधिकारी शिंदे नक्कीच आहेत. पण त्यावेळी या हिंदुत्वा विषयी सुध्दा दुकानदारी या पलिकडे ठाकरे ( सर्व पाती) यांचा काही संबंध नाही. ना हिंदुत्व जागरणात, ना हिंदुत्व रक्षणार्थ.
त्यामुळे या निकालांमुळे हिंदुत्व याचे काय? याचा विचारही करू नये. हिंदू ह्रदय सम्राट शब्द चार दिवस पिचकवणी सारखे किरकिर करू दे. पण हिंदू ह्रदय सम्राट शब्द या निकालातील कोणत्याही व्यक्तिस लागू नाही. व हिंदुत्व एवढे लहानही नाही.
तरी सुद्धा घराणेशाही किती निर्दयपणे नष्ट होते यासाठी हे उदाहरण म्हणून खूप महत्वाचे आहे. लालू, मुलायम, ठाकरे, व अंतिम टप्प्यावरील गांधी/ नेहरू.
नाकाने कांदे सोलणा-या विचारवंतांसाठी, लोकशाही व समाजाची समजूत कळली असेल तर, धन्योहम.
सुनील देशपांडे.
पुणे
९४२०४९५१३२.
Comments
Post a Comment