शिवजयंती

आज शिवजयंती आहे. त्यामुळे शिवाजी महाराज की जय व भारत माता की जय, एवढेंच स्वर उमटू द्या. आजच्या दिवशी मध्येच मी मराठी, महाराष्ट्र धर्म व. लहान लहान घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उद्देशाला लहान ही करायला नको व बदनामही.

शिवाजी महाराज हे मुगल, आदिलशाही, कुतुबशाही अशा राष्ट्र विरोधी शक्तींशी लढले. काशी विश्वनाथ मुक्त करण्यासाठी लढले. हिंदू मंदीराच्या पुनर्निर्माण साठी लढले. बाबाजी निंबाळकर व नेताजी पालकर यांच्या घर वापसी साठी लढले. व्यंकोजीराजे भोसले यांना आम्ही तुर्कांविरोधी लढतो आहोत हे तंजावरला जाऊन सांगितले. शत्रू कोण हे स्पष्ट करण्यासाठी सांगितले. स्वधर्म, स्वभाषा, स्वदेश याचा अर्थ किती खोल आहे हे समजावून सांगण्यासाठी लढले. यासाठी राजभाषाकोष संस्कृत मध्ये निर्माण करण्यास सांगितले. नव्हे केले. राज्याभिषेक हा प्रदर्शनी उत्सव नव्हता तर हिंदू हाच या देशाचा राजा आहे हे सत्य जगाला सांगण्यासाठी केला होता. म्हणून या सांस्कृतिक भारत समजून सांगणा-या सप्त मातांचे पाणी आणले होते, राज्यव्यवहार भाषा संस्कृत केली, .

हे समजून घेऊ. छत्रपती शिवाजी महाराज हे या अखंड देशाच्या स्वातंत्र्यासाठी, या विश्वचिंतनीय संस्कृतीच्या रक्षणासाठी, पुनर्स्थापना होण्यासाठी लढत होते. म्हणून शिवाजी महाराज की जय बरोबर फक्त भारत माता की जय एवढीच घोषणा होऊ शकते.

शिवाजी महाराज फक्त राष्ट्र नेते होते. ते भारताचे प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्र त्या दिव्य भारत रत्नमालेतील एक लखलखता हिरा आहे पण छत्रपती शिवाजी महाराज यांना गुंफायचा होता तो दिव्य भारत माता हार.

आज मितीला याचे पुन्हा स्मरण करू या.

आज शत्रूला अचूक ओळखलेल्या शिवाजी महाराजांचे स्मरण करू या. या देशाची शक्ती एकवटलेल्या संस्कृती ला, हिंदू संस्कृतीला ओळखलेल्या शिवाजी महाराजांचे स्मरण करू यात. संपूर्ण देश डोळ्यासमोर ठेवलेल्या शिवाजी महाराजांचे स्मरण करू यात.

ख-या अर्थाने शिवजयंतीचा राष्ट्रीय सण साजरा करू या.

सुनील देशपांडे
पुणे
९४२०४९५१३२.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन