सावरकर एक विशेष स्मरण

स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे एक वेगळे स्मरण.

सावरकर हे नाव अता दंतकथा बनून राहिले आहे. अशा चंडप्रतापी बुध्दीमान महापुरूषाला तर त्याच्याही नकळत समाज सहजपणे देव्हा-यात बसवत असतो. अशावेळी मला एका अत्यंत आगळ्यावेगळ्या विनायक दामोदर सावरकर यांचा परिचय करून द्यायचा आहे.

सावरकर अभ्यासताना त्यांच्या ध्येयशरण गुणवत्तेसाठी त्यांची समुद्र उडी, त्यांची शस्त्रे, त्यांचे काव्य, व अशा अनेक कृती विचारात व स्मरणात येतात. पण ह्या सर्व गोष्टी असणारे अनेक महापुरुष दाखवून देता येतील. पण मला एका अशा सावरकरांच्या कृतीकडे लक्ष वेधून घ्यायचे आहे की ते त्या कृतींमुळे एकमेवाद्वितीय ठरतात.

सावरकरांनी ध्येयवाद किती कठोरपणे आत्मसात केला होता की ध्येयवाद यशस्वी होण्यासाठी स्वतः चे , स्वतःच्या प्रतिमेचे, पोटच्या पोराप्रमाणे असणा-या संघटनांची तिलांजली त्यांनी दिली. हेच सावरकर आठवू या.

प्रथमतः तुलनेनी सोपी कृती म्हणजे अभिनव भारत ह्या स्वतः लावलेल्या रोपाचे समर्पण. आज पर्यंत माझ्या पहाण्यात तरी अशी कृती कोणी केलेली माहिती नाही. स्वातंत्र्य मिळाले, अभिनव भारत ची भूमिका संपली तर फक्त बोर्ड हटवला नाही तर सांगता समारोप केला. त्यांच्या मुळे वलयांकित झालेली संस्था उद्देश संपला तरी स्वतः ला तेजोमंडीत ठेवण्यासाठी वापरणे हे सावरकरांनी केले नाही. हे माझ आहे अशी म्हणणारी बारीकशी गोष्ट सोडताना होणारा मोह हा सावरकरांनी सहज टाळला व एवढेच नव्हे तर स्वातंत्र्याचे श्रेय घेण्यासाठी ढाल म्हणून ही संस्था वापरली नाही. हे ते वैशिष्ट्य होते.

पण याहूनही आवघड व म्हणून सावरकर एकमेवाद्वितीय ठरतात ते ध्येय समर्पित आयुष्यातील अजरामर कृती साठी. डॉ हेडगेवार यांनी १९२५ साली संघ स्थापन केला व हिंदू समाज संघटित करण्याचे ध्येय ठरविले. एका अर्थाने सावरकरांनी स्वीकारलेल्या व्रतातून वेगळा प्रवाह होता. स्वतः च्या ध्येय प्रवासातील अडथळा होता पण ध्येयधुंद सावरकर येथे सापडतात.

सावरकरांनी आपली सर्व शक्ती डॉ हेडगेवार यांच्या पारड्यात टाकली. जेष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांना डॉ हेडगेवार यांच्या बरोबर दिले. संघाला माणस मिळवून दिली. सुरुवातीचे अनेक प्रतिष्ठित संघचालक हे हिंदू महासभेचे प्रमुख असतं.

मला प्रश्न पडला असे का? व उत्तर ही मिळाले की ध्येयरूप व्यक्तिमत्व नव्हे ध्येयविलोप व्यक्तिमत्व म्हणजे काय? भारत विकासाची पूर्व अट हिंदू संघटन आहे व हे काम हेडगेवार करू शकतात. मग माझ्या पारड्यात यशाची माळ पडो वा न पडो. ध्येय जिंकले पाहिजे, व सावरकर तसेच वागले. हिंदू समाज संघटित करण्याचे श्रेय डॉ हेडगेवार यांच्या वाट्याला निर्विवाद पणे आले व अर्थात ते बरोबरच आहे. पण सावरकरांच्या वाट्याला एक हेटाळणी आली सावरकरांपाशी कर्तृत्व होते पण नेतृत्व नव्हते.

कुणालाच सावरकरांचा हा त्याग कळला नाही.

हे लख्ख उदाहरण आहे कि सावरकर किती महान संघटक होते कि ध्येय साकारण्यासाठी पोटच्या पोरासारख्या जपलेल्या संघटना बळी दिल्या. पण हिंदू राष्ट्र ध्येय भारतीय समाज जीवनाच्या केंद्र स्थानी आणण्यात यश मिळवले व ते ही नि: श्रेयस पध्दतीने.

आज मला प्रकाश झोता सारखे जाणवलेले सावरकर आपणासाठी.

सुनील देशपांडे.

९४२०४९५१३२
पुणे 

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन