शिवराज्याभिषेक व काशी विश्वनाथ

शिवराज्याभिषेक व काशी विश्वनाथ

शिवराज्याभिषेक सोहळा हा फक्त सत्तेसाठी नव्हे तर संपूर्ण देशाचा व संस्कृतीचा महिमा वाढावा म्हणून केलेला एक राष्ट्र जागरणाचा उपक्रमच होता. मी उभे करीत असलेले हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य आहे हा विश्वास भारतभर पसरलेल्या हिंदू समाजाला व आग्र्याहून राजगडापर्यंत सर्व गावोगावच्या हिंदू लोकांनी आमचा राजा म्हणून जे सहकार्य शिवाजी महाराजांना केले, त्या नात्याचा उच्चरवात केलेला हुंकार म्हणजे शिवराज्याभिषेक. म्हणून हा राष्ट्रीय सोहळा. म्हणून हा हिंदू साम्राज्य उत्सव.

सन १६६६ साली शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटका करून घेतली व १६६९ साली औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदीराला भ्रष्ट केले. त्यानंतरची शिवाजी महाराजांची कृती आम्हाला सांगते कि शिवाजी महाराज संपूर्ण हिंदू समाजाचा विचार करत होते न कि फक्त महाराष्ट्र वा मराठी माणसांचा. मी आपला सेवकच आहे म्हणत त्यांनी तक्रार काय केली तर जिझिया कर रद्द करा. हिंदुंवरील अन्याया विरूद्ध तक्रार केली आहे. डोळ्यासमोर संपूर्ण हिंदू समाज आहे. म्हणून शिवराज्याभिषेक हा अनन्यसाधारण महत्वाचा आहे व राष्ट्रीयत्वाचा अर्थ उलगडणारा आहे.

शिवाजी महाराज हे आग्र्याहून सुटले पण राजगडावर पोहोचे पर्यंत एका अर्थाने शत्रूच्या मुलखातुन येत होते व दिवसेंदिवस प्रवास करत होते. हे कसे जमले? याचे उत्तर आहे, आपल परक हा फरक जाणणारा हिंदू समाज या सर्व वाटेवर होता. औरंगजेब परका व शिवाजी महाराज आमचा हे कळणारा समाज हेच शिवाजी महाराजांचे संरक्षण कवच होते व त्यांना विश्वास देण्यासाठी शिवराज्याभिषेक होता. संपूर्ण देश आपला सोहळा म्हणून पहात होता.

संभाजीराजे थोडे थोडके नाहीत वर्षभर मथुरेत औरंगजेबापासून हाकेच्या अंतरावर रहात होते. मुंज करून ब्राह्मण म्हणून. हे का घडले? कारण मथुरेतील हिंदूना आपला राजा संभाळायचा होता. मोरोपंत पिंगळे यांच्या बहिणीने सांभाळले पण अख्ख्या मथुरेच्या हिंदूंचा कोट होता.

आग्रा ते राजगड हा प्रवास फक्त युध्दस्य कथा रम्या नव्हत्या तर पराभूत देश असतानाही सांस्कृतिक राष्ट्र तसेच पूर्ण जाणीवांनिशी जिवंत होते याचे प्रतिक आहे. म्हणून हा प्रवास सांगतो शिवराज्याभिषेकाचा अन्वयार्थ.

का शिवराज्याभिषेक साजरा करायचा तर शिवाजी महाराजांचे उद्दीष्ट कळावे म्हणून. शत्रू मित्र भाव कळावा म्हणून. सांस्कृतिक एकात्मता कळावी म्हणून.

व हे सर्व सांगण्यासाठी शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक करून घेतला. काशीतून हाक आली.

अशा अनेक कड्या अभ्यासू म्हणजे कळेल शिवराज्याभिषेक म्हणजेच हिंदू साम्राज्य उत्सव आहे.

सुनील देशपांडे
पुणे
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन