शिवराज्याभिषेक व गागाभट्ट
आपण शिवराज्याभिषेक हा हिंदू साम्राज्य उत्सव का व कसा? हे पहात आहोत. अखंड ३५० वर्षे हिंदू समाजाला हा दिवस प्रेरणा व उत्साह देत आहे व महत्वाचे म्हणजे हिंदू समाजाची स्वयमेव मृग्रेंदता ही भावना जागी ठेवत आहे. एकेका उदाहरणामधून आपण हा अर्थबोध करून घेत आहोत.
आज भेटू या गागाभट्ट यांना. काशीहून राजगडावर आले,हजारो मैलांचा प्रवास करून आले. बिन बुलाए मेहमान म्हणून आले व येथेच लिहिले गेले कि शिवराज्याभिषेक हा सामान्य सोहळा नसून संपूर्ण भारत वर्षाची ही आर्त गरज आहे.
कारण गागाभट्ट एकटे आले नाहीत, तर त्यांच्या बरोबर हिंदुत्वाचे, राष्ट्रीयत्वाचे भूत, वर्तमान व भविष्य चालत आले होते, अता हिंदू राजा हवा ही आर्त मागणी चालत आली , भग्न पावलेली मंदीरे, त्याचे चिरे चालत येत होते, असुरक्षित स्त्रीची वेदना चालत येत होती, एका मागास तत्वज्ञानावर आधारित क्रुर पंथाच्या विकृत वर्तनाने भांबावून गेलेला सर्वसमावेशक हिंदू विचार चालत येत होता, संपूर्ण देश चालत येत होता. म्हणून हा राज्याभिषेक संपूर्ण देशाचा उत्सव होता.
गागाभट्टानां राजगडावरून निमंत्रण गेले नव्हते. ते स्वतःहून आले होते. राजाला राज्याभिषेक करून घे ही विनंती करायला आले होते. यातच या राज्याभिषेकाचे सर्व महत्व अधोरेखित झाले आहे. भगवान शंकराच्या ज्ञानव्यापी मंदिराचा विध्वंस व अशा अनेक मंदीरांचा इस्लामिक क्रुरतेमुळे झालेला विध्वंस आपल्या पुर्नप्रतिष्ठेसाठी गागाभट्टांच्या रुपाने या ठिकाणी आला होता. झिझिया कराने अपमानित होणारा हिंदू समाज आपल्या अपमानाच्या बदल्याच्या अपेक्षेने आला होता. मोगलाईला कंटाळलेला हिंदू आपली दु:खी कहाणी घेऊन आला होता. विकृत विचारधारेमुळे अपमानित स्त्री समुदाय होता.
गागाभट्ट आले म्हणजे हे सगळे आले. म्हणून हा राज्याभिषेक फक्त राजाचा सन्मान नव्हता तर या संपूर्ण भारतीय समाजाचे ते स्वप्न होते. म्हणून हा संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी दिवस आहे. हा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे हिंदू साम्राज्य उत्सव आहे.
सुनील देशपांडे.
पुणे
९४२०४९५१३२.
Comments
Post a Comment