संसद भवन उदघाटन सोहळा
कोणताही सोहळा निर्विघ्नपणे पार पडायचा असेल तर विघ्नसंतोषी लोकांचा गोंधळ आवश्यक असतो व वरील प्रसंगी तो नीट घातला गेला. व त्याचे एका वाक्यात वर्णन हा राज्याभिषेक सोहळा होता असे वरील गोंधळी मंडळींकडून झाले.
मला आनंद झाला कारण त्या निमित्ताने आणखी एका राज्याभिषेकाचा विचार व तुलना करता येणार आहे. या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा ३५० वा सोहळा आहे. ३५० वर्षांनंतर सुध्दा हिंदू समाज हा दिवस आनंदाने, अभिमानाने हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा करणार आहे.
तोही एक राज्याभिषेकच होता. पण साधा नव्हता. आत्मविस्मृत हिंदू समाजाला आत्मसन्मानाचा, विजयाकांक्षी बनण्याचा सन्मान देणारा दिवस म्हणून तो फक्त राज्याभिषेक न राहता हिंदू साम्राज्य दिन झाला होता व म्हणून तो विशेष होता.
नवीन संसद भवन हे लाचार, अगतिक, आत्मश्लाघा करणारे असणार नाही तर विश्व जननी भारतीय संस्कृतीचे प्रतिक असणारं आहे हे सांगणारा सोहळा आहे. म्हणून हा सोहळा काही जणांना प्रतिगामी राज्याभिषेक वाटला. मोदींचा राज्याभिषेक वाटला. पण भारतीय संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती ही विश्व पथ दर्शनासाठी गरूड भरारी घेत आहे हा संदेश देण्यासाठी हा सोहळा आहे. व म्हणून कुणाला हा राज्याभिषेक वाटला तर लक्षात घ्या, ३५० वर्षांपूर्वी ज्या कारणासाठी राज्याभिषेक झाला व समाजाने तो आत्मसन्मानाचा जागर म्हणून स्विकारला तसेच आजचा सांस्कृतिक सोहळा हा संपूर्ण देश भारताच्या वैश्विक जबाबदारीची जाणीव म्हणून स्विकारत आहे. राजकीय नेता हा समाज हुंकाराच्या आंकित आहे हे सांगणा-या सेंगोलच्या दिमाखदार पुनरागमनाने सजलेला आहे. विश्व विजय नाही तर विश्व कल्याण हा मंत्र सांगणारा हा सोहळा हा राज्याभिषेक नाही तर समाज सन्मान सोहळा आहे. ज्या संस्कृतीने जगाला bomb नाही तर लस दिली, युध्दात आडकलेल्या जगभरातील नागरिकांची सद् भावनेने सुटका केली त्या संस्कृतीचा जयघोष म्हणजे हा संसद भवन सोहळा होता.
पुढील काळातील भारताच्या सांस्कृतिक जबाबदारीच्या भानासाठी हे आवश्यक होते. दोन्ही.
शिव छत्रपतिंचा राज्याभिषेक व नवीन संसद भवनाचा सांस्कृतिक उदघाटन सोहळा.
सुनील देशपांडे.
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment