राम मंदिर झाले पुढे काय

अयोध्या स्थित राम मंदिराचा आंदोलनाचा भूतकाळ व अभूतपूर्व चळवळीचा इतिहास सध्या सतत हिंदू मनाला पुलकित करत असतो. पण अता मंदीर उभे राहिले. हजार वर्षे टिकेल एवढे शक्तिशाली ही बनले आहे. पण या भव्य तेजस्वी मंदीराला काही सुचवायचे आहे का? भविष्याचे काही दिशा दर्शन हे राम मंदीर करत आहे का?

प्रभू रामचंद्र स्वतः अवतारी पुरुष होते, अशक्य असे काहीच नव्हते. तरीही पत्नी सीता हिची रावणाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी फक्त वैयक्तिक अन्याय ही भूमिका ठेवली नाही. तर सीतेवरील अन्याय हा सर्व स्त्री जातीवरील अन्याय आहे व तो कसा दूर केला पाहिजे याचे साक्षात उदाहरण घालून दिले आहे.

वनवास पत्करला, सामान्य वनवासी बंधुंपासुन नागर जनते पर्यंत सर्वांची संवाद केला, चौदा वर्षे संघटन केले व सर्वांना कर्तव्य कर्ता बनवले. सर्व समाजाला स्त्री महात्म्याचे महत्त्व पटवून दिले व नंतर रावण वध केला. उत्तर दक्षिण भारत हा ध्येयवादाने एकात्म करून दाखवला. हे प्रभू रामचंद्रांचे स्मरण आवश्यक आहे.

तलवार, सरकार, लष्कर यांने मिळणारे विजय आवश्यक असतात पण ते तेव्हांच चिरस्थायी ठरतात ज्यावेळी संपूर्ण समाजाने त्यासाठी आहुती दिलेली असते. या मंदिराच्या ६०० वर्षातील संघर्षाच्या इतिहासातील शेवटचा कळसाध्याय हा समाजाने स्वयंप्रेरणेने घडवला आहे व म्हणून तो विजय चिरस्थायी आहे व म्हणून आपण म्हणू शकतो की हे मंदीर सहस्त्र वर्षे टिकणार आहे.

देशात अनेक चांगल्या घटना घडल्या आहेत पण त्या टिकाऊ कधी होतील. ज्यावेळी संपूर्ण समाज ती घटना आपली मानेल, त्यावर अभिमान मानेल, त्यावेळीच ती घटना चिरस्थायी ठरेल. अयोध्या राम मंदीराचा हिंदूंसाठी हा एक संदेश आहे.

३७० कलम सरकारने घालवले पण कधी तर ज्यावेळी हिंदू समाज राजकीय परिवर्तनासाठी राजकीय हिंदू बनला त्यावेळी. म्हणून ३७० कलमाने कधीच डोके वर काढायचे नसेल तर नित्य जागृत हिंदू समाज हीच त्याची खात्री असेल.व अशा सर्वच विजयांबाबत समाज तो विजय किती आपला मानतो त्यावर त्या विजयाचे चिरंजीवित्व अवलंबून आहे.

उभ्या राहिलेल्या राम मंदीराचा हिंदू समाज व राष्ट्राला हा एक संदेश आहे.

असेच अनेक संदेश हे राम मंदीर देत आहे ते पुढील लेखांमधून पाहू यात.

सुनील देशपांडे
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन