राम मंदिर झाले पुढे काय भाग ३

अयोध्येत राममंदिर झाले आहे. भव्यदिव्य झाले आहे व सुंदर ही झाले आहे. पण भविष्यात काय? हे समाज मंदिर भविष्यासाठी हिंदू समाजाकडून काही अपेक्षा करीत आहे का? काही संकेत देत आहे का? देत असेल तर ते कोणते? हे आपण पहात आहोत. मंदिर सुंदर झाले आहे. म्हणजे बांधकाम सुंदर, मूर्ती सुंदर, परीसर सुंदर, सुखसुविधा सुंदर, रेल्वे स्थानक सुंदर, विमानतळ सुंदर हे सर्व तर असणार आहेच. पण ज्या हिंदू समाजाने रामललाची आज्ञा शिरसावंद्य मानून हे सुंदर शिल्प उभारले त्यानेही सुंदर दिसावं व असाव, हा संकेतही हे राम जन्म स्थळ देत आहे. कसे? ते पाहु या.

अयोध्या राम मंदिर निर्माण म्हणून जे सामाजिक रण  झाले त्यात संपूर्ण देशाने सहभाग दिला. सर्व भौगोलिक क्षेत्राने दिला, सर्व समाजाने दिला. निरपवादपणे सर्व समाजाने दिला. व येथूनच रामलला आपल्याला भविष्यातील सामाजिक अचरणा संदर्भात संकेत देत आहेत. अयोध्या आंदोलन संपूर्ण समाजाचे होते म्हणजे जात पात  यांच्या सीमा पुसून हिंदू सारा एक या उद् घोषाचे होते.

त्या अयोध्या रणाच्या सामाजिक जाणीवांच्या कहाण्या अंगावर शहारे आणणा-या होत्या, मोहरून टाकणा-या होत्या. दीर्घ काळाच्या घट्ट मूळ धरून बसलेल्या कुरितींना दूर करण्यासाठी समाज सुधारकही अपुरे पडले होते. कुरितींना फक्त कुरवाळणे नव्हते तर अभिमानाने मिरवणे पण होते अशा कुरितींना दूर करण्यासाठी भगवान श्रीराम यांनी शेवटी स्वतःलाच कारण बनवले असे वाटते. कारण त्या अयोध्या रणाने या कुरितीच्या भिंती कडाडून कोसळवून दाखवल्या होत्या.

कोण,कुणाचे कोण, पण एकच जात राहिली होती रामनामाची. ठाकुरांच्या गढी वर केरळातील दलित डाळ रोटी खात होता, एखादा उद्योग पती झोपडीत लवंडलेला दिसत होता पण कोणताच भेद कुणाला स्मरतही नव्हता. जात नाही रामकाज हीच ओळख बनली.हिंदुत्वाने सर्व भेदावर मात केली होती. सुंदर एकात्म समाजाचे दर्शन त्यावेळी सर्व जग घेत होते. ही सामाजिक सुंदरता ही तात्कालिक न ठरता कायम स्वरुपी वज्रलेपी ठरली पाहिजे हा भविष्यासाठीचा संकेत हे मंदीर देत आहे.

प्रभू रामचंद्रांचे निषादांशी असलेले संबंध, वनवासी सुग्रीवाशी असलेले आत्मिय भाव, व तत्सम सामाजिक व्यवहार हेच रणकाळातील आदर्श होते. पण असे दिवस फक्त आंदोलन म्हणून चालत नाहीत तर कायम स्वरूप असावे लागतात.

म्हणून हे मंदिर हिंदू समाजाला जाणीव करून देत आहे की ही एकात्म समतेची भावनाच देशाची शक्ती आहे. व ती भावना प्रयत्नपूर्वक सांभाळावी लागते व वाढवावी लागते. समाजातील एकात्मता वाढेल, दुराव्याचे विषय मागे पडतील, विस्मरणात जातील हे पहावेच लागेल. मोठी ध्येये समोर ठेवावी लागतील, कुरितीच्या छोट्या रेषा हिंदुत्वाच्या मोठ्या रेषेने पुसाव्या लागतील व हे काम एखादा समाज सुधारक नाही तर संपूर्ण समाजाने सतत करावे लागेल तरच सुंदर समाज बनेल व टिकेल.

सुंदर मंदिर, सुंदर समाज बनवण्याचे आवाहन करीत आहे. समाज म्हणून आपल्याला सुंदर मंदिराकडून हाच संकेत भविष्यासाठी आहे. आपण तो आमलात आणू या.

हे व असेच संकेत राम मंदीर देत आहे. पुढील लेखात अजूनही काही संकेत समजून घेऊ यात.

सुनील देशपांडे
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन