राम मंदिर झाले पुढे काय भाग ५
अयोध्येत राममंदिर झाले. भव्यदिव्य झाले, सुंदर झाले, दणकट झाले, युग प्रवर्तक असे मंदीर तयार झाले. हिंदू समाजाने स्वयं प्रेरणेने अर्वाचीन काळात केलेला सर्वात मोठा पराक्रम आहे. संपूर्ण विश्वाचे लक्ष लागलेले होते,अशी ही निर्मिती झाली आहे. ज्यावेळी अपमानाचा प्रतिक ढाचा पडला त्यावेळी पृथ्वीच्या पश्चिमेला पराभवाची, जेत्यांच्या विजयाची खूण असलेली प्रसिद्ध बर्लिन भिंतही कोसळत होती. हा योगायोग एवढ्यासाठी आठवायचा कि बर्लिन भिंती प्रमाणे अपमानाचा ढाचा पडलेली घटना ही सुध्दा विश्वाच्या चर्चेची होती. कारण इस्लामच्या आक्रांताशी कसे दोन हात करायचे या प्रश्नाचे सभ्य जगाला पडलेले कोडे हे रामललाचे अयोध्या स्थित मंदिर सोडवणार होते. म्हणूनच ही वैश्विक जबाबदारी उचलण्याचे आवाहन राम मंदिर हिंदू समाजाला व भारताला करत आहे.
राम मंदिर समाजाकडून भविष्यात काय अपेक्षा करीत आहे हे आपण पहात आहोत. अब्राहामिक परंपरेतील सर्वात विकृतपणे, असहिष्णूपणे विजातीय समाजांकडे पहातो त्या इस्लामला कशा प्रकारे सभ्य जगाने विरोध करावा, कशा प्रकारे संघर्ष करावा, कशा प्रकारे इस्लामला ताडन करावे हे जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीने, समाजाने व देशाने म्हणजे हिंदू समाज व भारताने जगाला शिकवावे ही अपेक्षा राम मंदिर करत आहे.
ही ऐतिहासिक जबाबदारी हिंदू समाजावर येऊन पडली आहे कारण हिंदू समाजाने राम मंदिरासाठी केलेला अभ्यासपूर्ण संघर्ष. अयोध्या आंदोलन हे जगातील एकमेव असे इस्लामी आक्रांता विरूध्द चे यशस्वी आंदोलन आहे जे सरकार, सैन्य, तलवार या शिवाय होऊन सुध्दा यशस्वी झाले. या पूर्वी इस्लामचा पराभव युरोपात झाला आहे पण तो तलवारीच्या जोरावर झाला आहे. पण संपूर्ण समाजाने इस्लामचा विकृत आक्रांत अभ्यासून इस्लाम, सरकार, बेताल विचारवंत या सर्वां विरुध्द एकाचवेळी एल्गार केला व निशस्त्रपणे पण लढाऊ वृत्तीने दीर्घकाळ संघर्ष करून पराभव करून दाखवला. पण राम मंदिर हिंदू समाजाला भविष्यात हा मार्ग सर्व जगाला दाखवण्याची प्रेरणा आपल्याला देत आहे.
कुराण,हदीस, शरीया यातील नागरी सभ्यतेच्या विरुद्ध कोणतेही कलम सभ्य जग सहन करणार नाही व त्यामुळे वरील तीनही sources अपरिवर्तनीय असणार नाहीत हे आपण सिध्द करायचे आहे. जबरदस्तीने देवालय, जरी कोणी मूर्तिपूजक नसेल तरीही, त्याला पाडता येणार नाही. आम्ही बहुसंख्य रहाण्यासाठी ३७० कलमाचा सहारा घेता येणार नाही, तोंडी तलाक देऊन कोणाही महिलेच्या भावना अपमानित करता येणार नाही, देश, मातृभूमी हे आम्हाला मान्य नाही हा उद्धटपणा खपवून घेतला जाणार नाही, झिझीया कररूपी अपमान चालणार नाही, विद्येची मंदीरे कुराणापेक्षा वेगळी म्हणून जाळून टाकता येणार नाहीत. हे आणि असे बरेच काही करून भविष्यात विकृती कशी रोखायची याचे जगाला मार्गदर्शन भारत व हिंदूनी करावे ही अपेक्षा राम मंदिर व्यक्त करते.
राम मंदिर 'जगाच्या कल्याणा' आमच्यासाठी वरील संकेत देत आहे.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment