वीर विनायक दामोदर सावरकर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हा फक्त नामोच्चार सुध्दा कोणत्याही वयातील माणसाला तरुण बनवतो, क्रियाशील बनवतो, तळपती तलवार बनवतो, संवेदनशील ह्रदय बनवतो, ध्यासी बनवतो, साहित्यिक व सैनिक एकाचवेळी बनवतो, ध्येयधुंद बनवतो, कणखर बनवतो, कडवाही बनवतो व क्षमाशीलही बनवतो. यात अजून कोणतेही विशेषण टाका. चालेल. तो बावनकशी सोन बनवतो.
भारतात अशी काही नररत्ने जन्मली, ज्यांना पुर्नजन्माची गरजच पडली नाही. त्यांच्या साठी अनेक जन्मांची परमेश्वराने नेमलेली कामे या अद्वितीय पुरुषांनी एका जन्मातच पुर्ण केली. परतीचे दोरच कापून टाकले. त्यातील एक महनीय व्यक्ती म्हणजे विनायक दामोदर सावरकर.
स्वातंत्र्य योध्दा म्हणून काम दिले तर, वाक्वैभवही तुझ अर्पियेले असे म्हणत बोरू पासून बाॅंब पर्यंतचे सर्व मार्ग हातळले, होरपळून घेतले व अनेकांना चालवत नेले. साहित्य निर्मिती करा असा संकेत दिला तर एका जन्मात एक साहित्य शाखा असा धोपट मार्ग नाही तर येथेही उत्स्फूर्त उधळण. कथा कादंबरी, काव्य, नाटक, इतिहास, चरित्रे सर्वकाही. अगदी उर्दू गझला सुध्दा. कल्पना उत्तुंगच करायची, शत जन्म शोधताना . साहित्य निर्मिती ही केली व त्यातुनच बाॅंब ही घडवले.
अंदमानच्या छळातून बाहेर पडले तर हिंदू समाज सुधारक बनून. सप्त बेड्यात लिप्त हिंदू समाजाला साखळदंड मुक्त केला, श्रुती स्मृती पुराणोक्त मुक्त अप टु डेट केला, या सुधारकासाठी एक जन्म राखून ठेवला होता, तोही या महापुरुषाने वापरला नाही.
राष्ट्र उध्दारासाठी राजकारण पण याच जन्मात उरकले, सांसदीय लोकशाहीतील पक्ष चालवला, देश शस्त्रसज्ज बनवा, आंतरराष्ट्रीय संबंध राष्ट्रीय स्वार्थावर चालवा हे ही सांगितले.
समाजाचे अंग असे नाही जेथे सावरकरी मुद्रा नाही. जन्मानुजन्माची कामे संपवून आज रोजी हा महामानव स्वतःहून स्वर्ग मार्गे गेला.मृत्युने हाक मारण्या आधी ओ देऊन गेला. हिंदू समाजाला चिरंतन प्रेरणा देऊन गेला.
त्रिवार वंदन, महामना.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२.
१. हिंदू महा सभेच्या विरूद्ध आपले उमेदवार उभे करून करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाडले. हे कटू सत्य.
ReplyDelete२. "श्रुती स्मृती पुराणोक्त मुक्त अप टु डेट केला" म्हणजे नेमके काय केले ? हे वाक्य आपण 'संघी सोईनी' वापरलेले आहे, हे उघड आहे. आजही संघाला सावरकर सोईपुरते हवेत. बाकीचे सावरकर संघाला अजिबात प्रिय नाहीत.