सिएए लागू झाले
असं काय महत्वाचे घडले आहे की याचा फार गंभीरपणे विचार केला पाहिजे.
सीएए लागू होणे म्हणजे फक्त नागरिकत्व कायद्यात काही तांत्रिक बदल एवढाच अर्थ नाही तर स्वातंत्र्यापासून ज्या चुकांना, चुका म्हणून मान्यता नव्हती, ती सरकारने दिली आहे. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला पण देशाची, मातृभूमीची फाळणी झाली व त्याचा आधार होता मुस्लिमांना पंथाआधारे स्वतंत्र भूमी. व म्हणून पाकिस्तान इस्लामी देश बनला.
त्याचा दुसरा अर्थ, नव्हे एकमेव अर्थ होता इस्लाम मानणारे सोडून इतर सर्व दुय्यम नागरिक होत. इस्लाम जगभरचा इतिहास व वर्तन हेच सांगते कि शरिया राज्यात अन्य नागरिक जनावराहून हीन जीवन जगतात. खरं तर मरत असतात.
अशावेळी फक्त मुसलमान हेच त्या भूमित रहात असते तर प्रश्न भिन्न होता पण तिकडे मुसलमानांशिवाय हिंदू, त्या शिवाय बौध्द, जैन, ख्रिश्चन व थोड्या अधिक संख्येने शिख बांधव ही रहात होते. व ते सतत पांथिक क्रुरतेचा अनुभव घेत होते. पण त्यांना कुणी वाली नव्हता. व आशेने, जीवाच्या आकांताने ती जनता भारताकडे पहात होती पण भारत म्हणजे जणू किंकर्तव्यमूढ अर्जुनच बनला होता. आपल्या माणसांना आपलं म्हणायचीच चोरी होती. व जीवाच्या भितीने शरणांगत तर येत होतेच. सत्तर वर्षे निर्वासित होते.
आवश्यकता होती भारताने आपले कोण हे ओळखण्याची. व आज ती ओळख पूर्ण झाली. पाकिस्तान म्हणजे इस्लाम, ज्यांना आपली धार्मिक ओळख जपतो म्हणून त्रास देतो, अन्याय करतो, क्रुर वागतो, ते अन्याय ग्रस्त म्हणजे आमचे. म्हणजे हिंदू हे आमचे. त्यांचे रक्षण, प्रतिपाळ हे आमचे कर्तव्य. ही ओळख भारताला होतीच होती, पण आज सरकारने ती निर्भिडपणे स्विकारली. हो सेक्युलर ची झिंग टाकून सत्य स्विकारले की भारत जगभरातील हिंदूचे पालकत्व करतो. हे सरकारचे ऐतिहासिक दायित्व आहे.
ही वैचारिक पराभवाची सल आता राष्ट्रवाद विरोधी घटकांना त्रास देत आहे. धार्मिक आधारावर वेगळेपण. होय. पंथ अन्याय करत आहे तर, ज्या समुह घटकांवर अन्याय होतो त्यांना सरकार साथ देणार, सन्मान देणार. निर्वासित नाही, नागरिक मानणार.
हा अधिकृत धार्मिक आधार ही अतर्क्य वाटणारी गोष्ट म्हणजे सिएए. म्हणून भारतातील हिंदू विजयाचे आणखी एक प्रासाद चिन्ह.
हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवाद सरकारने स्विकारला आहे याचे आणखी एक उदाहरण.
म्हणून हिंदू म्हणून अत्यानंद.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२.
Comments
Post a Comment