स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहिला

मी आज कोथरूड सिटी प्राईडला पूर्ण गर्दीत पाहिला. सावरकर व्यक्तिमत्त्व इतक्या संवेदनशीलपणे पण चित्रपट भाषेचा सुंदर वापर करून चित्ताकर्षक ही बनवले आहे.

चित्रपट अप्रतिम पण परिणामकारक आहे, याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या २७ वर्षाच्या मुलाला तो आवडला व सावरकर त्याला भावले. चित्रपटाचा हेतू १००% यशस्वी झाला आहे.  सावरकर म्हणजे जन्मठेप व समुद्रात उडी एवढेच नाहीत, तर स्वतंत्र भारतालाही ते दिशा दर्शक होते हा मुलाच्या मनात आला त्यातच चित्रपट जिंकला आहे.

अनेकांनी चित्रपटाचे खूप सुंदर समिक्षण केले आहे पण तरूणांवर गारूड टाकत आहे एवढेच मला लक्षात आणून द्यावयाचे आहे. हा महत्वाचा पैलू आहे. शेवटचे रॅप रसभंग करते असे माझे मत होते पण मुलाला ते फार आवडले म्हणून ते योग्यच आहे कारण सावरकर तरूणांचे प्रेरणास्थान बनले पाहिजेत व सिनेमा यशस्वी झाला आहे.

चित्रपट गल्ला या विषयावर एवढेच म्हणतो शुक्रवारी दुपारी १२.३० चा खेळ हाऊसफुल्ल होता.

चित्रपट तरूणाईचे आकर्षणं बनत आहे. आनंद.

सुनील देशपांडे.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन