राजकारण्याचे स्वगत
नमस्कार.
मी राजकारणी म्हणजे समजणा-या मराठीत, मी नेता. अर्थात ही बिरुदावली मिरवावी, अशी ही काही फार प्रतिष्ठेची नाही, पुलंच्या भाषेत म्हटल तर काही फार अभिमानाने मिरवावी अशी ही बिरुदावली नाही. पण तरीही जे पदरी घेतले आहे त्याचे काही स्वगत असू नये की काय? परत पुल ( माफी मागून). नसेल हे स्वगत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मृत्युच्या संक्लपने प्रमाणे महान. पण म्हणून काय झालं.
तर सामान्यपणे नेता ही गट व्यवस्था स्वतः च म्हणून काही तरी सांगावं व जनता जनार्दनाचे मन भारावून टाकावे अशी भाबडी व आपमतलबी नसते. पण तरीही मतदानाची अक्षद पडायला वाईच अवधि असल्याने थोडा time pass करत आहे. आम्ही स्वार्थी, आपमतलबी, दुस-याच्या टाळू वरील लोणी खाणारे, लोकांना वेठीला धरून मालामाल होणारे, व. मते सामान्यपणे सगळे जण मानतात, म्हणतात, मान डोलावतात. त्या माझे time pass स्वगत.
मी त्या सगळ्या अड्ड्यांवर, होटेलांमध्ये punching bag सारखा टांगलेला असतो व जाणारा येणारा, व अड्ड्यातल्या सर्वांना मधूनच हात मोकळे करायला सोय वाटत असते. हां पण आपल्याला पण काय तरास नसतो. आपलं पण एंटरटेनमेंट होत. आयला ह्यांनी का हाणली म्हणून पायल तर कालच सरकारी हापसातून रिटायर झालेला जनता मॅन मला हाणत होता. दोनदा लाच प्रकरणात आपणच मांडवली करून दिली होती. लय हसलो.
तो बेकार तरूण पण हणत बसला होता, पण मस्ती मिळल ते काम करीन यावर लावत नव्हता. अता उद्या पासून येईल, माझ्याकडे बोंबलत फिरायला. आपण उद्यापासून अदानीला शिव्या देणार, हे होळीच बोंबल सर्वात पुढ असलं. पण अदानी नि मी दोघही दिवस रात राबतो ते त्याला दिसत नाही. मी गाडी घेणार नाय पण बापाची गाडी पळवणार. ते बेण पायल मला मारताना, लय हासलो.
म्हण एक कोटीच लोक कर भरत्यात अन मला तर ५०/६० कोटी लोक धुतात, आमच्या पैशावर हा मजा मारतो. लय भारी वाटत ऐकताना. पहील पहील बिचकायचो जरा पण कळलं ह्ये एक नंबर पोकळ वासे हायती. काय डरायच नाही.
फुकट शाळा हैत पण याला डोनेशनची शाळा पैझे. येणार माझ्या कडे. ससून है पण मला खाजगीत फुकटात हवं. गॅस हवा, नळासाठी अनधिकृत कनेक्शन हव, हे हवं अन् ते हवं, त्यासाठी काय पण, अन बाहेर काय आव. पण आपल्याला आवडत. आपल्या मराठीत हिपोक्रसी का काय म्हणतात?
मस्त चालतय. आपण खूष. जनता पण खूष. आपल्याला होळी अन् पोळी दोन्ही. जनतेला अंधारात पाप, अन् दिवसा वांझोटी धुंद. दोनोभी खुष.
नाच झमोरे.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२.
Comments
Post a Comment