मुलाची शिकवणी म्हणजे ट्यूशन
खर तर माझा मुलगा अभ्यासात हुषार आहे. उत्तम गुण मिळवतो. पण आम्ही दोघेही नवरा बायको जीवनाच्या शर्यतीत जिंकण्यासाठी धावत आहोत. त्यामुळे शर्यत, एखाद्या मार्काचे महत्त्व व त्या साठी आटापिटा करणे हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. मुलाला माहिती आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही. व ते जाणून घेण्या एवढा वेळ नाही. त्यामुळे कालोचित निर्णय घेतला की मॅथ्स, ( इंग्रजी मध्ये गणित) व सायन्स ( अर्थात इंग्रजी मध्ये शास्त्र) याची शिकवणी ( समजणा-या भाषेत ट्यूशन) लावू यात.
थोडे दिवस गेले व मध्यावधि निवडणूका आल्या. दि. १९ एप्रिल तारिख ठरली. मतदानासाठी दोघांना एकाच दिवशी सुट्टी मिळाली. चिरंजिवांना सांगितले की उद्या सुट्टी आहे,लाॅंग ड्राईव्हला जाऊ.
चिरंजीव सांतवे आसमान में असतील असे वाटले पण काहीतरी विपरीत घडले. आज चक्क लेका कडून नन्हाचा पाढा आला. बाबा उद्या सुटी नाही, उलट सर्वात महत्वाचे काम आहे. व फक्त काम नाही, कर्तव्य आहे. काल आमच्या नागरिक शास्त्राच्या बाईंनी सांगितले आहे की उद्या आई बाबांना महत्वाचं काम आहे म्हणून बाहेर जाऊ , होटेल मध्ये जाऊ असा हट्ट करायचा नाही. मी तुम्हाला काय शिकवले आहे की मतदान हा हक्क आहेच पण अधिक कर्तव्य आहे. व तुमच्या हट्टापायी त्यांनी मतदान केले नाही तर ते पाप कुणाच्या डोक्यावर येईल.
आपण कुठेही जायचे नाही तर घरीच रहायच. पण तुम्ही घरी आल्यावर ते मशीन, त्यावर नाव , चिन्ह कुठं कशी होती. मतदानाची चिठ्ठी आली का हे सगळ सांगायच. मग मी त्यावरच project करेन.
त्याला गणिताच्या शिकवणीची गरज आहे की नाही हे माहीत नाही पण मला मुलाने नागरिक शास्त्रासाठी मला शिकवणी आवश्यक आहे हे जरूर समजावून दिले.
एका मतासाठी सरकार अरुणाचल प्रदेश मध्ये ४० किलोमिटर वर बुथ टाकते व मी?
मुलाच्या शिकवणीमुळे माझ्या नागरिक शास्त्रीय कर्तत्वात मी पास होणार.
मतदान करणार.
सुनील देशपांडे.
९४२२३१०२३१.
Comments
Post a Comment