हिंदू जागरण कर्ता डॉ हेडगेवार

हिंदू जागरण कर्ता डॉ हेडगेवार 

भाबडे भगत गण नसलेला पण संपूर्ण दोन शतकांवर संपूर्ण भारतावर प्रभाव टाकलेला एकमेव नेता म्हणजे डॉ केशव बळीराम हेडगेवार .

आज त्यांचा जन्मदिवस.  हिंदू समाज जागरण व दिशादर्शन यासाठी मैलाचा दगड ठरलेला गुढी पाडवा हा दिवस हाच डॉ हेडगेवार यांचा जन्मदिवस असावा, ह्यालाच कदाचित नियतिचा संकेत म्हणत असावेत.

डॉ हेडगेवार हे समाज संघटक असले तरी हिंदू शब्द जोडलेला असल्याने व हिंदू समाज व धर्म हे दोघेही अत्यंत क्रुर व विकृत इस्लाम व धूर्त कपटी चर्च या नव्याने ओळख झालेल्या अब्राहामिक पंथांशी बावचळून संघर्षात अडकले असल्याने डॉ हेडगेवार यांचे समाज चिंतन हे हिंदू धर्म रक्षण चिंतनही मानले गेले व त्या अर्थाने डॉ हेडगेवार हे हिंदू अथवा सनातन धर्म रक्षक कार्यकर्तेही मानले गेले. असे असतानाही, धर्म संकल्पने जवळ असतानाही त्यांच्या भोवती भक्त नाही तर कार्यकर्ते उभे राहिले हे त्यांचे महानपण आहे व शतकातील म्हणून ते एकमेवाद्वतीय भारतीय नेते आहेत. कारण धर्म कार्य तरीही भक्त उभे राहू न देता, कार्यप्रवण स्वयंसिद्ध कार्यकर्ते उभे केले असे ते एकमेव नेते भारतीय इतिहासात आहेत.

हे संघटन उभारण्यासाठी व ते संघटन कालोचित लवचिक राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले. संघ यशाची कारणमिमांसा एक वाक्यात करायचे झाले तर ते हेच असेल की या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निर्माण डॉ हेडगेवार या ध्येयानेच केली होती न की डॉ हेडगेवार या देहाने.

डॉ हेडगेवार यांनी व्यक्तिनिरपेक्ष संघटन स्वतः च्या व्यक्तिमत्त्व विलोपाने उभारले असल्याने नेतृत्व बदलाने संघटनेमध्ये काही खळबळ झाली नाही. व दुसरे महान कार्य म्हणजे संघटनाभिनिवेष निर्माण न होण्यासाठी संघटना निर्माण करतानाच तिची तात्कालिकता सांगितली व संघटनेच्या समाज विलयाचे सुतोवाच करून ठेवले होते.

या दोन कृतींमुळे डॉ हेडगेवार हे शतकातील एकमेवाद्वितीय नेते ठरतात.

वास्तविक त्यांची प्रत्येक कृती ही विश्लेषण केली पाहिजे एवढी महान आहे पण ते इतरत्रही येईल. म्हणून अनुयायी नाही तर कार्यकर्ते उभे केले व संघटना उभारूनही अभिनिवेश येऊ नाही दिला हे अन्य कोणत्याही नेत्यात न दिसलेले दोन दिशादर्शक गुणांचाच उल्लेख करून थांबतो.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन