निवडणूक २०२४ हिंदू विजयाचे स्मितहास्य केरळ

२०२४ निवडणूक हिंदू चेह-यावरील स्मितहास्य 

वर्तमान लोकसभा निवडणूक, त्याचे निकाल, माध्यमावलंबामुळे आलेले नैराश्य, या पार्श्वभूमीवर मला अजून एका विश्लेषणामुळे हिंदू चेह-यावरील स्मितहास्य जाणवत आहे.

ते आहे केरळ राज्य. फक्त २० लोकसभा मतदारसंघ असलेला प्रांत. पण बंगाल नंतर स्वतःच्या संघटित शक्तीवर सत्तेत असणारे डाव्यांचे एकमेव राज्य. तसेच मरणप्राय काॅंग्रेसला लोकसभेसाठी धुगधुगी देणारा प्रांत. विरुध्द बाजूला अपरिमित त्याग, बलिदानानंतरही हिंदू संघटनेला राजकारणात मध्यवर्ती भूमिका घेऊ न दिलेला केरळ. अशा केरळमध्ये २०२४ च्या निवडणुकीने काय दिले हे पाहिले कि स्मितहास्याचे कारण कळते.

या निवडणुकीमध्ये केरळमध्ये १९५२ पासून प्रथमच कोणत्याही रुपातील जनसंघाला लोकसभेची जागा जिंकता आली आहे. थिसुर हा मतदारसंघ व सुरेश गोपी हा कलाकार. या मतदारसंघातून प्रथमच भाजप झेंडा खांद्यावर घेऊन विजयी झाला. सतत धडका मारून मारून हिंदू समाजाने केरळमधील डावा खडक फोडला.निसटता नाही. दणदणीत विजयाने फोडला. डाव्यांची हिंदू मतांवरील मक्तेदारी मोडून काढली. 

हिंदूंनी हिंदू म्हणून मतदान केले. जाती चौकटी बाहेर जाऊन आद्य शंकराचार्यांच्या जन्मभूमीवर हिंदू राजकीय भूमिकेवर पहिले यशस्वी शिक्कामोर्तब केले. पोप विरुद्ध लढा, शबरमलाईचा लढा व संघ स्वयंसेवकांनी केलेले हिंदू समाज संघटन याला पहिले यश मिळाले. पण या बरोबरच अजूनही काही घडले.

११ विधानसभा मतदारसंघात भाजप विजयी झाला व डावे फक्त १९. डावे व काॅंग्रेसची २/२ % मत कमी झाली व भाजपची ५% मत वाढली. केरळच्या इतिहासात प्रथमच तिरंगी लढत झाली. डाव्यांसाठी मृत्यू घंटा वाजली.

हे केरळ लोकसभा निवडणुकीने केले. अता आमच्यावर आहे स्वप्न तुटले म्हणून गलीतगात्र व्हायचे की या विजयाने प्रफुल्लित व्हावयाचे. मी कार्यकत्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने व त्यागाने स्तिमित व आनंदीत झालो आहे. 

निवडणुकीचे वास्तव हेच आहे की विजय ही विजय है.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन