नालंदा व शिवराज्याभिषेक
या जून २०२४ मध्ये दोन ऐतिहासिक महत्वाच्या घटना घडल्या. ज्यात काही साम्य स्थळे शोधणे आवश्यक आहे. नालंदा विश्व विद्यालय नवीन वास्तुत प्रविष्ट झाले व जेष्ठ शुध्द त्रयोदशी म्हणजे २० जून २०२४ शिव राज्याभिषेक दिन आहे.
दोन्ही प्रसंगात काही महत्वाची साम्य स्थळे आहेत. नालंदा पुन्हा निर्माण करावे लागले कारण ते बख्तियार खिलजीने कुराणाशिवाय अन्य ज्ञान नाही म्हणून जाळून टाकले होते. ज्ञानाचा जगातील सर्वात भयावह अपमान या ठिकाणी झाला. व पराभूत मानसिकतेतील हिंदू समाजाने या विकृत सरदाराचे नाव उत्तर प्रदेश मधील रेल्वे स्टेशन वर काल परवा पर्यंत उरावर बाळगले होते.
तर हिंदू राजा, विजिगिषु असू शकत नाही हा ५००/६०० वर्षांचा अपमान शिव छत्रपती यांनी ३५० वर्षांपूर्वी मोडून काढला होता.
म्हणून या दोनही दिवसांचे महत्व एकच आहे. अपमान गिळायचा नाही तर प्रतिशोध घेऊन नष्ट करायचा असतो हे महत्व अधोरेखित होते.
व प्रतिशोधही किती सकारात्मक व तेजस्वी. ज्ञानाचा अपमान पराभूत केला नवीन विद्यापीठ व त्याच स्थानी, त्याच नावाने प्रस्थापित करून. व हे हिंदू समाजाने शेकडो वर्षे सल मनात ठेऊन घडवून आणले. तर शिवाजी महाराजांनी हिंदू संस्कृतीचा अपमान, काशी विश्वनाथाचा अपमान, विजिगिषु वृत्तीचा विजयनगरच्या साम्राज्या नंतरचा अपमान, एकात्म सांस्कृतिक राष्ट्र संक्लपनेचा अपमान धुवून काढला. मैदानावर लढाया जिंकत, संस्कृत राजभाषाकोष करून सप्त सिंधुंनी अभिषेक करून, अपमानित मंदिराचे पुनर्निर्माण करून व हिंदू विजयाकांक्षी बनवून धुवून काढला.
दोन्ही प्रसंगात हे साम्य फारच महत्त्वाचे आहे.
अपमानाचा सूड आहेच पण नवनिर्मिती ही आहे.
अपमानाचा सूड ही किती सुंदर, निर्मितीक्षम, व प्रेरणादायी बनू शकतो हे या दोनही प्रसंगातून जाणवतो.
म्हणून आज हिंदू साम्राज्य दिनी भारताच्या आगामी चैतन्यमय जागरणाचे स्वप्न पाहू या.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment