भारतीय सार्वभौमत्वाचे जीवनदान डॉ मुखर्जी यांचे बलिदान

श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान स्मरण दिन.

स्वातंत्र्योत्तर भारतातील स्वातंत्र्यासाठीचे पहिले आंदोलन छेडले असतानाचा पहिला बळी म्हणजे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी होत. स्वातंत्र्योत्तर भारतातील स्वातंत्र्यासाठी ह्या परस्पर विरोधी भासणा-या वाक्यातच या आंदोलनाचे महत्त्व लपलेले आहे. व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलीदानी नेतृत्वाचे सुध्दा.

वास्तविक स्वतंत्र भारतातील पहिल्या मंत्रीमंडळात ते व्यापार मंत्री होते. पण वैयक्तिक स्वार्था पलिकडे राजकारण ठेऊन ते सत्तेतून बाहेर पडले व नवीन राजकीय पक्ष स्थापन केला.

कलकत्ता या विख्यात विद्यापिठाचे ते पूर्वी कुलगुरू होते. तसेच फाळणीच्या वेळच्या बंगाली हिंदूंच्या हतभाग्याचे साक्षीदार होते. व त्यामुळे इस्लाम, मुस्लिम व्यवहार व त्यातील विकृत लालसेशी नीट परिचित होते. त्यामुळे या देशात राष्ट्र सर्वेतोपरी असा भाव असणारा पक्ष आवश्यक आहे हे जाणले व भारतीय जनसंघ स्थापन केला.

त्या नंतरचे हे पहिलेच आंदोलन. नव्हे स्वतंत्र भारतातील पहिला स्वातंत्र्य लढा उभारला. काश्मीर मध्ये. काश्मीर संस्थान सार्वभौम भारतात विलिन करण्यात पं. नेहरुंनी जो होळ घालून शेख अब्दुल्ला यांना नेतृत्व देण्याच्या अट्टहासापायी संविधानाचीच गळचेपी केली व भारतीय सार्वभौमत्वालाच चेष्टेचा विषय बनवले.

विचित्र परिस्थिती निर्माण झाली कि देशात एकाचवेळी दोन प्रधानमंत्री, दोन संविधान व दोन ध्वज अस्तित्वात आले. देशभक्ती सोडून रक्तात अन्य कोणताच घटक नसलेल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी या निलाज-या राष्ट्रद्रोही निर्णयाला विरोध केला व आंदोलन छेडले हेंच ते भारतीय स्वातंत्र्याचे स्वतंत्र भारतातील आंदोलन.

एक देशमे दोन विधान, दो प्रधान, दो निशान नहीं चलेंगे. या मुद्द्यावर देशभरात आंदोलन सुरू केले. स्वतः काश्मिरात जाऊन सत्याग्रह केला. मुस्लिम नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरचे भवितव्य काय असणार हे स्पष्ट झाले. विद्वान, देशभक्त, निस्वार्थ नेतृत्वास काश्मिरातील तुरुंगात संशयास्पद मृत्यू आला. व शेख अब्दुलांचा व इस्लामचा खरा चेहरा स्वतंत्र भारतात दृगोचर झाला.

पण बलीदान कधीच व्यर्थ जात नाही. सरकारला थोडी लाज आली व विघटनवादी काही तरतुदी कमी झाल्या पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी संपूर्ण देशाला काश्मीर लढ्यासाठी जागरूक केले व काळ्या इंग्रजांना वठणीवर आणले. संपूर्ण देश अता भारतीय सार्वभौमत्वासाठी लढा उभारेल हे सरकारांना कळले. बलिदान प्रेरणा ठरली.

व काळावर मात करीत त्यांच्या विचारधारेने, हिंदुत्वाने ३७० कलम घालवले व जम्मू काश्मीरचे भारतातील विलीनीकरण संपूर्ण करून दाखविले.

बलिदान भारतीय सार्वभौमत्वाचे जीवनदान ठरले.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन