माध्यमावलंबिंचा सावळागोंधळ
माध्यमावलंबियांचा सावळागोंधळ
जमिनी वास्तवाशी काहीही संबंध नसताना माहितीच्या मायाजाळात अडकून स्वतःच स्वतःला दु:खी करण्याचा खेळ सध्या माझ्या सारख्या सामान्य माणसांचा चालू आहे. व ही माहिती अनेकविध मार्गांनी व इतक्या वेगाने आदळत आहे की ती स्विकारताना त्याचे तार्किक विश्लेषण करण्याची मनस्थिती राहीली नाही. अन्यथा विजयानंतर एवढी हतबलता मला वाटलीच नसती.
माझ्या सारख्याचा आणखी एक विशेष दोष मला जाणवला. स्वतःच्या सामान्यपणावर मात करण्यासाठी मला तालेवार माणसे, पक्ष, संघटना यांना लहान दाखवण्याची संधी मिळाली की मी ती पूर्ण ताकदीनिशी वापरून घेतो. कारण त्यांचे दोष काढून मी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो. मोदींपासून सुरवात करून, फडणवीस मार्गे पुण्यातील कार्यकर्ते कसे चुकले व म्हणून आपण हरलो हा तो प्रवास असतो.
तेंव्हा माझे तर्कशास्त्र अडगळीत पडलेले असते. अरे तू तुझ्या अपेक्षाभंगाला, प्रत्यक्ष विजय असून पराजय म्हणतो आहेस. पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात काही दिवसांपूर्वी विजयी झालेले घंगेकर २५००० मतांनी पिछाडीवर पडले. जनतेने तिचे काम चोख पार पाडले आहे. पण माध्यमावलंबी झालो असल्याने जे सांगितले जाते ते माझ्याकडून पडताळले जात नाही व मी हतबल होतो.
सरकार बनणार म्हटल्यावर २९० चे ३०५ झाले. या सर्वांना नीट कळलं की कोण जिंकले आहे. कोट्यवधी जनतेच्या अपेक्षा मधून कोट्यवधी अपेक्षा जन्म घेतात तरीही १० वर्षे जनता समाधानी आहे व विद्रोह कोठेही नाही हे सांगणारा हा विजय आहे पण हे तार्किक मला उमजत नाही. सर्व माध्यमे शर्यतीत टिकण्यासाठी anti establishment भूमिका घेत आहेत व आम्ही तेच खरे मानून चाललो आहोत.
पण मी विचार केला की खरच हिंदू जातीत आडकले होते का? मग २४० कोठून आले? तामिळनाडू मधून जय श्रीराम कोठून आले? तेलंगणात भाजप का जिंकला.
तर लोकांनी भाजपला राष्ट्रवादाला, हिंदुत्वालाच विजयी केले आहे. मला फक्त तार्किकपणे निकालाकडे पहायचं आहे.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२.
Comments
Post a Comment