निर्माणों के पावन युग में मला दिसलेला हिंदू इतिहास

निर्माणोंके पावन युग में 
मला दिसलेला हिंदू इतिहास

मला खरच इतिहास समजून घ्यायचा आहे की इतिहासातील अशी कोणती कृति आहे जी हिंदूंना हिंस्त्र असे संबोधन लावू शकते. 
सहज आठवला पृथ्वीराज चव्हाण. युध्द आहे, जिंकले. शत्रू शरण आला. संपले. क्षमा हे सामर्थ्याचे लेणे मानले गेले.

दत्ताजी शिंदे आठवले. पराक्रमातही उन्मत्तपणा नाही तर तत्वज्ञानाचा आधार. हतासि प्राप्यते स्वर्गम. 
ऋषि अगस्ती आठवले. जगभर गेले कंठस्नान नाही, रक्ताचे पाट नाहीत, स्त्रीचा अनादर नाही. फक्त निर्माण. मध्य आशियात गेले त्यावेळी वस्त्र लेवणे शिकवले, फेडणे नाही. त्या जगभर गेलेल्या हिंदूंनी शिकवलेल्या निर्मितीची शेकडो उदाहरणे नवनिर्मित मंदिरा आधारे तेथे उभी आहेत व त्यातील एकही मंदीर मूळ ढाचा पाडून बनलेले नाही. कसे हिंदूंना हिंस्त्र म्हणू.

लाखो, करोडो पानांच्या हिंदू इतिहासात, पराक्रमाच्या इतिहासात मला हिंसा का दिसत नाही, परमत दुराग्रह का दिसत नाही, विध्वंस, विनाश का दिसत नाही? फक्त नवनिर्मितीच दिसते.
व हे इतिहास नाही तर वर्तमानात तरी वेगळे काय घडत आहे. मुस्लिम देशांमधील यादवीत भारतीय सर्व ( भारतीय) मरु नयेत म्हणून परत आणताना अन्य देशांचे भयग्रस्त नागरीकही परत सुखरुप आणले ते ही भारतातील हिंदू नेतृत्वाने व करोनात लस वाटून सुसंस्कृत मनाचे दर्शन कोणी घडवले?

खरच हिंसक हिंदू हा काय प्रकार आहे. मला इतिहासापासून वर्तमाना पर्यंत हिंदू जाणवला तो असा दिसतो.

निर्माणोंके पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले,
स्वार्थ साधना की आंधीमें वसुधा का कल्याण न भूले.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन