११ सप्टेंबर हिंदू चेतना दिवस

आज रोजी स्वामी विवेकानंद व हिंदू वैश्विक चिंतन सोडून काहीही आठवत नाही. व नाहीच आठवणार. कोणाही हिंदूला आज हिंदुत्वाचे वैश्विक एकात्मतेचा आधार सहजीवन चिंतनच आठवणार व जगाला सुद्धा विवेकानंद व त्यांनी सांगितलेला हिंदू धर्मच आठवणार.

असे असूनही, हिरेजडीत लखलखते तत्वज्ञान स्मरण दिवस असूनही मला आज गारगोटीचेही स्मरण झाले व मेल्याहून मेल्यासारखे झाले. सध्या या ११ सप्टेंबरला संस्कृती शब्दाची ओळख फक्त कम सप्टेंबरची ट्यून ऐकण्याएवढीच ( सांस्कृतिक कार्यक्रम) ज्या नररत्नाला आहे, असा एक भारतीय नेता खरतर टोणगा सध्या त्याच अमेरिकेत आहे व बालिशपणाचे प्रदर्शन मांडत फिरत आहे. बा राहुल गांधी, तुला अमेरिकेत जाऊन बौद्धिक विकृतीचा एवढाच पाऊस पाडायचा होता तर निदान सप्टेंबर महिना तरी सोडायचा ना? तुला हिंदू धर्म, तत्वज्ञान, समाज याचा तिरस्कार आहे हे समजू शकतो पण एक महिना उशीराने जायचे ना? आक्टोबर चांगला आहे. हिंदुंना हतोत्साही करणा-या महत्म्यांचा जन्मदिवस येतो. त्या महिन्यात या बाळबोध पण विकृत विचाराला तुलनेला तरी जरा मजा आली असती. पण हिंदुंचा वैश्विक तत्वज्ञान विजय दिवसही त्यांना आनंदाने साजरा करु दिला नाही व मलाही तुझ्यासारख्या गारगोटीचा विचार करावा लागला.

पारतंत्र्य, हतबलता, आत्मविस्मृतता या सर्वांनी ग्रस्त असलेल्या हिंदु धर्म व भारताचे प्रतिनिधित्व करताना त्या महामना स्वामी विवेकानंदानी भारताला ओज दिला तर विश्वाला सहजीवनाची ग्वाही दिली. व आज आपण काय बरळताय? नशीब स्वामी विवेकानंदांची ओळख नसल्याने त्यांचा विकृत वापर तरी तुझ्या कडून झाला नाही.

पण काय बोलला आहेस तिथे. घटना बदलू.? आरक्षण रद्द करु? अरे विदुषका, तू भारतीय राज्यघटनेविषयी बोलत आहेस, तेही परकीय भूमिवर. हे विषय भारतात व भारतीय जनतेसमोर बोलायचे असतात. जगाला आम्ही राज्यघटनेच्या चौकटीत राहून काम करतो हे सांगायचे असते व तू तर या देशाचा सन्मान वाढवायचा सोडून अब्रू वेशीवर टांगायला निघालास? म्हणून संस्कृती माहिती लागते. त्यासाठी रामायण महाभारत माहिती लागत. गीता सार माहिती लागत. तर कळते 
वयं पंचादिकम शतं म्हणजे काय? 


म्हणून म्हटले की कशाला रे ११ सप्टेंबर या हिंदू स्वाभिमान दिनी त्या अमेरिकेत तडफडला व काळ फासल. आम्हाला Brothers & Sisters of America हे जगाला पुलकित केलेले शब्द आठवू दे. सहजीवनाच्या मंत्राने भाव विभोर होऊ दे. नको तुझे गारगोटी विचार दर्शन.

एक काम कर. बाळा राहुल गांधी तू परत ये व आक्टोबर मध्ये जा. तुझ्या विदुषकी वर्तनाचा आनंद आम्ही तेंव्हा घेऊ. सध्या आम्हाला स्वाभिमानी हिंदूच राहु दे. त्या विश्वचिंतक स्वामी विवेकानंद यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली राहु दे.

तेवढ दे. तुझ्याकडून याहून अधिक अपेक्षा करण्याचा मुर्खपणा मी करणार नाही.

भारतासाठी, हिंदू समाजासाठी ११ सप्टेंबर म्हणजे फक्त विवेकानंद व विवेकानंदच.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन