जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक एक पैलु

देशातील सर्वात महत्वाच्या विधानसभा निवडणुकीत दोन टप्प्यांचे मतदान झाले आहे. व तिसऱ्या व शेवटच्या टप्प्यातील मतदान होऊ  घातले आहे. जम्मू काश्मीर नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. व म्हणून सुध्दा महत्वाची आहे. पण ही निवडणूक खरी महत्वाची आहे कारण सामान्य निवडणुकीसारखी नाही. सामान्य निवडणुकीतील उत्साह हा माझा पक्ष, माझा उमेदवार व त्या विषयीची उत्सुकता अशी असते पण तो विषयच या जम्मू काश्मीर निवडणुकीत नाही.

ही विधानसभा निवडणूक अतिशय गंभीर, गुंतागुंतीच्या विषयांवर भाष्य करणारी पण प्रत्यक्ष प्रचारात ते विषय कधीच समोर येणार नसल्याने समजून घ्यायला कठीण आहे. निवडणूक प्रचार हा ३७० /३५ ए रहाणार की जाणार? बेरोजगारी, विकास, आझादी, दंगाधोपा मुक्त, या विषयावर झाला असला तरी त्या आधारे मतदान होते की नाही? हे ठरणारी म्हणून कुतूहुल चाळवणारी आहे. यातून शोधायचे अंतरप्रवाह फारच वेगळे आहेत. 

मग काय घडणार आहे? ह्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत. त्यामुळे या निवडणूक प्रचारात आलेले काही मुद्दे विचारात घेऊ यात. कधी नव्हे ते श्यामाप्रसाद मुखर्जी, टपलू, अन्य काश्मिरी हिंदू यांचे बलिदान व त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या नावाने अनेक सरकारी योजना चालू आहेत व ती नावे चर्चेत आहेत. हे पहिल्यांदा घडले आहे. व्यासपीठावरून योगी आदित्यनाथ यांच्या मुखातून POK मध्ये व तो जम्मू काश्मीरला जोडला जाण्याचा, बलुचिस्तान स्वतंत्र होण्याचा विषय उघडपणे चर्चेत आला आहे. जम्मू भाग जागा वाढल्यामुळे तितकाच महत्त्वाचा ठरला आहे. पहाडी मुस्लिम जातींना आरक्षण मिळाले आहे. प्रथमच मुसलमान जात निहाय चर्चेत आला आहे. मुस्लिम brotherhood ला अधिकृत तिलांजली मिळाली का? हा प्रश्न विचारता येईल असे घडत आहे का? हे कधीच नसलेले प्रश्न समोर आले आहेत.

अता विचार करु या की निकालातून काय शोधायचं आहे? मला पक्ष महत्वाचा वाटत नाही कारण तो येथे वेगळ्या अर्थाने महत्वाचा नाही आहे. यात विश्लेषण करावे लागणार आहे की मुस्लिम फक्त इमान धरुन राहणार आहे, त्याच्या फक्त इस्लाम खतरेमें या घोषणे आडून व्यूहबध्द मतदान करणार आहे की सेक्युलर कारणासाठी मतदान करणार आहे? हे शोधायला सोपे आहे. दुसरीकडे हिंदू मृत्युची टांगती तलवार डोक्यावर असताना तरी political accumanship दाखवू शकतो का? ह्याचे उत्तर मिळणार आहे. तेही विश्लेषण करायला सोपे आहे. पाकिस्तानची दशा ही कुठेतरी मुस्लिम मनात घर करत आहे का? आमची मुलं, त्यांचे भवितव्य की इस्लामशी इमान यात जम्मू काश्मिरी मुसलमान काय निवडतो त्याची ही निवडणूक नीरक्षीरविवेक करणार आहे. जम्मू परिसरातील मुसलमान सहजीवन स्विकारणार आहेत की तकिया करणार हेही ठरणार आहे.

म्हणून ही निवडणूक मोदी शहा यांची नाही, कोणत्याही पक्षाची नाही तर संपूर्ण भारतीय जनतेच्या एकात्म देशाच्या कल्पना फलद्रूप होतील की नाही हे ठरवणारी आहे.

म्हणून वेगळी पण सर्वात महत्वाची आहे.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन