सांस्कृतिक राष्ट्रवाद कविता
संस्कृती राष्ट्र बनविते, राज्य अहंकार,
राष्ट्र सूर बनविते, राज्य मात्र असूर.
इतिहासाच्या पानोपानी, आहे सर्व भरून,
शोधू या सागरतळी, मोती पडले पसरून.
हुण, कुशाण, सिकंदर, कथा रक्त मांसाची,
अन्याय, अत्याचार, आक्रांती, खरे तर क्रौर्याची,
राज्य कल्पनेच्या अहंकाराची, मानवी विकृतीची, निरपवादपणे सा-या जगाच्या पाठीवरती.
पण अपवाद राष्ट्र बनविते, संस्कृतीच्या साहाय्याने
कथा अगस्तींची बनते, रक्त मांसाची नसते,
कथा संस्कृतीची बनते, वस्त्र प्रदानाची बनते,
भक्षकाचा लवलेशही नसतो, संस्कृती शिक्षक देते.
भारतमाता प्रयोगशाळा, संस्कृती अन् राष्ट्रवादाची
शांतता, सहचर्य, आणि वैश्विक चिंतनाची,
पराक्रम अन् विजिगिषुतेची, सौहार्द अन् समन्वयाची,
विश्व संचार जरी, तरी आक्रांत नाही, वखवख आणि विखार नाही.
राजा अशोकाला तोड नाही, पण विश्व संचाराला तलवार नाही,
मुल मुली जगभर जाती, नत मस्तक धर्म पताका हाती,
असे घडले नाही एक हाती धर्म व तलवार दुस-या हाती,
संस्कार, संस्कृती, शिक्षण, हीच होती शस्त्रे हाती.
पण ही प्रयोगशाळा, दश सहस्त्र वर्षे अनुभवी,
विविधता रक्षुनी, पण अंतरीक एकात्मता शोधी,
राम कृष्ण शिव भक्ती, गीता,गंगा, गौपूजी,
ही आंतरिक एकात्मता, राज्य सोडून राष्ट्र उभारी.
जग भयाच्या उंबरठ्यावरी, संघर्ष, युध्द, विचारधारा एकारली,
पूर्वेकडे पहात आहे आशेनी, विजयशालीनी संस्कृती,
सांस्कृतिक राष्ट्रवाद उत्तर, विखारा शिवाय विजीगिषु संस्कृती
राजा नाही तत्वज्ञ, संत महात्मे प्रवक्ते
म्हणूनच विश्वास जगाला वैश्विक एकात्मतेचा.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment