दीपावलीचा उत्साह
आमच्याकडे दिवाळी आजपासून सुरू झाली आहे. हिंदूंसाठी उत्साह व ऐश्वर्य याचे मूर्तरूप दिवाळी माझ्या घरी दणक्यात प्रविष्ट झाली आहे.
प्रकाशमयी दिवाळीसाठी आकाशकंदील स्थानापन्न झाला आहे. फराळाशिवाय दिवाळी? शक्यच नाही. म्हणून उद्घाटनाला लाडू व शंकरपाळीने हजेरी लावली आहे. नवीन मेंबर घरी आल्याने उत्साह वाढला आहे व सहभागही. देवाला नैवेद्य ही दाखवला गेला आहे.
कुटुंब हे संस्कार पिठातील प्राथमिक शाळा म्हणून सर्वात महत्वाचे. व त्याचे प्रत्यंतर येते दिवाळीतील सर्वांच्या सहभागातून. आम्ही दोघे आहोतच, पण कुटुंबातील पुढची पिढी मुलगा व सून यांनीही जोरदार सहभाग देऊन दिवाळीच्या धार्मिकतेला उत्साहाची किनार लावली आहे.

सर्वच हिंदू सणांप्रमाणे कुटुंब संस्कार शिबीरातील सर्वात मोठे शिबीर आज आमच्या कुटुंबात सुरू झाले आहे. भाऊ बहिणी, नवरा बायको, मुल मुली, सुना, नातवंडे सर्व नाती सांगणारी दिवाळी आज सुरू झाली.
आनंद, उत्साह व ऐश्वर्य सर्व काही व सर्वदूर.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment