संघ समजून घेता येईल?

सध्या स्वाभाविक देशभरात चर्चा असलेला विषय आहे 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
प्रेम करण्यासाठी वा द्वेष करण्यासाठी सगळ्यात सोपी संघटना आहे 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
पण तरीही ती संघटना कळली असे शाखेत न जाणा-या अथवा न गेलेल्या कोणालाही समजणे खरोखरच खूप अवघड आहे.
पण तरीही अवघड प्रश्न सुटावा, त्याचे उत्तर मिळाले असे प्रत्येकाला वाटते.
म्हणून संपूर्ण समजेल की नाही सांगता येणार नाही, पण पूर्वग्रहदूषित म्हणून समजून घेणारच नाही, असे सोडून, सर्वांसाठी मी तीन पुस्तके सुचवितो.
१ डॉ हेडगेवार 
चरित्र लेखक ना. ह. पालकर.

२ नानांचे मनोगत
संघाची तात्विक भूमिका 
लेखक ना. ह. पालकर 

३ सामाजिक समता व हिंदू संघटन 
श्री बाळासाहेब देवरस.

या जोडीला दैनिक संघ कामातील applied कामातील नाहीत, ४/५ सामान्य स्वयंसेवकांची संपूर्ण ओळख व मैत्री.
मला वाटते संघ ब-याच अंशी समजेल.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन