भगिनी निवेदिता
भगिनी निवेदिता
हिंदू धर्म, हिंदू तत्वज्ञान, हिंदू समाज व हिंदू राष्ट्र हे सर्व एक सनातन वैश्विक चिंतन आहे हे व्यवहारिक पितळीवर सिध्द होते ते भगिनी निवेदिता यांच्या संपूर्ण जीवन कहाणी मधून. म्हणून ज्यावेळी सर्व जग हिंदू जीवनदृष्टी व वैश्विक चिंतन समजावून घेण्यासाठी असूसलेली आहे, अशावेळी तर भगिनी निवेदिता यांचे जीवन उदाहरण म्हणून जगासमोर नीट मांडले गेले पाहिजे.
भगिनी निवेदिता या आयर्लंड मध्ये राहणा-या स्काॅटीश होत्या. शिक्षिका होत्या, इंग्लंडमध्ये रहात होत्या. कोणत्याही अर्थाने हिंदू धर्म, तत्वज्ञान, समाज व राष्ट्र या चारही अंगांशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध आला नव्हता. स्वामी विवेकानंद यांच्याशी त्यांचा संबंध आला, त्यांना मानवतेचा मुलाधार हिंदू धर्म थोडा फार विवेकानंद यांच्या विचार व कृती मधून समजला होता. व त्या प्रभावाने निवेदिता भारतात आल्या व संन्यास घेऊन भगिनी निवेदिता बनल्या.
भगिनी निवेदिता यांच्या जीवनाचा अभ्यास हा अनेक अर्थांनी हिंदू वैश्विक चिंतन समजावून घेण्यासाठी अत्यावश्यक आहे. कारण ही कहाणी फक्त गुरु शिष्यांची नाही. तर एक संपूर्ण जीवनदृष्टी स्विकारण्यासाठी कोणकोणते घटक प्रभाव टाकतात, त्याची आहे. म्हणून आगामी काळात जगात हिंदू वैश्विक चिंतन जे मार्गदर्शन करणार आहे त्याची पार्श्वभूमी आहे.
भगिनी निवेदिता यांच्यावर तत्वज्ञान व धर्म म्हणून स्वामी विवेकानंद यांचा शिकवणूकीचा पूर्ण प्रभाव होता. किंबहुना ह्या दोनही विषयांचे ज्ञान त्यांना विवेकानंद यांच्या शिकवणुकीतुन मिळाले. व कृतितूनही. मूळात कोणत्याही पंथात स्त्रीचे स्थान हा अपमानास्पद वाटावे असे होते. पण त्याला पहिला छेद मिळाला हिंदू धर्म व तत्त्वज्ञानात. मग वेदकालीन ब्रम्हर्षी महिला हे उदाहरण म्हणून होतेच. पण ते फार प्राचीन झाले. पण अर्वाचीन काळात तर प्रत्यक्ष भगिनी निवेदिता याच धर्मातील स्त्रीचे स्थान याचे उत्तर ठरल्या.
व्यवहारीक जगात स्त्री समानतेची अपेक्षा ठेऊ शकत नव्हती, हिंदू धर्म सोडून अन्य पंथात तर तिला मानवीय अस्तित्व ही देण्यास कोणी तयार नव्हते, तेंव्हा अध्यात्मातील सर्वात उच्च संक्लपना संन्यास, हा अधिकार भगिनी निवेदिता यांना मिळाला व त्याहुनही महत्वाचे म्हणजे लाखो हिंदू नर नारींनी तो स्विकारला. हिंदू वैश्विक चिंतन हे फक्त तत्वज्ञान नाही तर व्यवहारात उतरलेले आहे हे, स्त्री सन्मान ज्या सहजतेने हिंदू नर नारींनी स्विकारला, यातून सिध्द होते.
भगिनी निवेदिता यांनी हिंदू धर्म, संन्यस्त धर्म स्विकारला, पण सेवेसाठी, कार्यासाठी कर्मभूमी जन्मस्थान न निवडता कर्मभूमी भारत निवडली. कारण हे हिंदू राष्ट्र आहे. जर धर्म हाच जगण्याचा आधार असेल तर धर्म संक्लपना वैश्विक सहजीवनासाठी पटवून देणे हे ज्या देशाला परमेश्वरी योजनेतून ठरवून दिलेले कार्य असेल तर मला ते येथेच आपल मानून केले पाहिजे, ह्या भावनेने भगिनी निवेदिता यांनी भारतभूमी हे कार्यक्षेत्र स्विकारले.
महिलांसाठी शाळा काढल्या. स्वतः भारतियत्व शिकून, भारतीय शिक्षण पध्दती आधारित त्या शाळा चालवल्या. प्लेगमध्ये लोकांची सेवा केली. व त्याहूनही महत्वाचे म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग दिला. यातील राष्ट्रीय दृष्टीकोन ठेवून बंगालच्या फाळणी विरोधासह अनेक आंदोलनांना सहकार्य केले.
म्हणजे एकत्रित जर आपण भगिनी निवेदितांचा अभ्यास केला तर जाणवते की ११ सप्टेंबरला स्वामी विवेकानंद यांनी जो हिंदू वैश्विक चिंतन पुर्नजागर उभारला त्याचे तात्कालिक उदाहरण म्हणजे भगिनी निवेदिता यांचा प्रवास होय.
भगिनी निवेदिता यांनी हिंदू धर्म, हिंदू तत्वज्ञान स्विकारले पण तेथेच थांबून न रहाता हिंदू नर नारींबरोबर धर्म व तत्वज्ञान व्यवहारात जगण्याचा मार्ग स्विकारला. व महत्वाचे म्हणजे हिंदू वैश्विक चिंतनाची प्रयोगशाळा म्हणजेच भारत देश, हिंदू राष्ट्र हा आपला देश मानला, त्याची सुख दुःख समजून घेऊन त्यात समरस झाल्या. अशा प्रकारे जग भारताकडे ज्या वैश्विक सहजीवनाचा मार्गदर्शक म्हणून पहात आहे, त्यातील प्रत्येक स्तंभाचा मनापासून स्वीकार केला.
हिंदू धर्म, हिंदू तत्वज्ञान, हिंदू नर नारी, व भारत म्हणजे हिंदू राष्ट्र सर्व काही स्विकारले व वर्तनात आणले. म्हणून आज ज्यावेळी भारत संपूर्ण विश्वाला आपल्या वैश्विक चिंतनाद्वारे शांततामय सहजीवनाचा मार्ग दाखवणार आहे त्यावेळी त्याचे सिध्द उदाहरण म्हणून भगिनी निवेदिता यांचे चरित्र अभ्यासणे आवश्यक आहे.
म्हणून आज जन्मदिनी भगिनी निवेदिता यांचे स्मरण करू या.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment