वंदे मातरम् गीताची १५० वर्षे

वंदे मातरम् गीताची १५० वर्षे 

आईला आई म्हणणे जिथे पाप ठरले मातेला देवीचे स्थान देणे जिथे लज्जास्पद ठरले त्या दुर्दैवी राष्ट्रगानानेच राष्ट्रभाव जागरणाचे कर्तव्य निष्ठेने पार पाडले. त्या प्रेरक गीताचे प्रेरणा कार्य अता १५० वर्षाचे होत आहे.
वंदे मातरम् बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७६ साली लिहिले. त्यांच्या आनंदमठ कादंबरीमध्ये ते १८८२ साली समाविष्ट झाले. तर १८९६ साली काॅंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात ते प्रत्यक्ष रविंद्रनाथ टागोर यांनी गायले होते. आज सुध्दा राष्ट्रीय चेतना जागृतीसाठी वंदे मातरम् हे गीत व वंदे मातरम् ही घोषणाच, हेच काम करते. राष्ट्रभक्तीची भावना व शत्रूबोध परिचय हे दोनही पैलु अत्यंत तरलपणे समाविष्ट झालेली उत्कृष्ट कादंबरी म्हणजे आनंदमठ ठरते. यात अन्यायाच्या परिमार्जनासाठी धर्म ( संन्यासी) उभा रहातो व त्याचवेळी बंगालचा नबाब हा मुसलमान आहे त्यामुळे दमनकारी इंग्रज व बाहुले सत्ताधिश मुस्लिम नबाब दोघांविरुद्ध संघर्ष होत आहे. 
१८८२ साली आनंदमठ लिहिली गेली व १९०५ साली म्हणजे फक्त २३ वर्षांनी बंगालची फाळणी मुस्लिम तुष्णीकरणासाठी झाली. पण त्या कादंबरी व वंदे मातरम् गीताने इंग्रज व मुस्लिम विघटनवाद सख्य हा शत्रूबोध बंगाली जनतेला नीट करून दिला होता. व म्हणून १९०५ साली झालेली बंगाल फाळणी १९११ साली रद्द झाली. त्या लढ्यातील सर्वांच्या तोंडी वंदे मातरम् होते. बंगाली हिंदूना शत्रूबोध करुन दिलेले संस्कृतप्रचुर वंदे मातरम् हे गीतच राष्ट्रीय प्रेरणा ठरले व म्हणूनच १८९६च्या काॅंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात प्रत्यक्ष रविंद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम हे गीत सादर केले.

पण १८९६ साली रविंद्रनाथ टागोर यांच्याकडून गायले गेलेले काॅंग्रेसच्या अधिवेशनातील संपूर्ण वंदे मातरम् १९२३ साली महान गायक व देशप्रेमी विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडून काकीनाडा अधिवेशनात शेवटच्या वेळी संपूर्ण गायले गेले. कारण त्यावेळच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अली व त्यांनी विरोध केला होता. कारण भारताला माता म्हटले व देवतेची उपमा दिली. पलुस्कर ठाम राहिले पण काॅंग्रेस नाही.
या सत्तावीस वर्षात काय घडले तर मुस्लिमांसाठी केलेली दुर्दैवी बंगालची फाळणी या गीतातून प्रेरणा घेऊन हिंदू नेतृत्वाने उधळून लावली. म्हणून म्हणता येते की या गीताने हिंदुंना फक्त सांस्कृतिक राष्ट्रवादच नाही तर शत्रुबोधही शिकवला. राष्ट्र म्हणजे फक्त भूमि नाही तर तेथे राहणा-या समाजाचा समान शत्रू मित्र भाव ही असतो हे या गीताने शिकवले म्हणून आजही राष्ट्रगीता बरोबरीने वंदे मातरम् फक्त शब्दच व संपूर्ण वंदे मातरम् हे समाजाला राष्ट्राप्रति कर्तव्यासाठी प्रेरीत करते.

त्या गीताची ही दिडशेवी जयंती आहे.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन