वंदे मातरम् रचेते बंकीमचंद्र चट्टोपाध्याय
वंदे मातरम् शब्द व काव्य एवढे प्रेरणादायी कसे ठरले आहेत? ते शब्द ताकदवान आहेतच. पण त्या शब्दांना स्वातंत्र्य लढ्यात शलाका निर्माण करण्याची क्षमता, १९०५ सालची बंगालची म्हणजे भारताची फाळणी जाळून राख करण्याची शक्ती कोठून आली, याचा शोध घेताना मला जाणवले ते या महान निर्मितीच्या निर्मिकाचे म्हणजे बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या व्यक्तिमत्त्व. शब्दाला मंत्राचे सामर्थ्य तेंव्हाच प्राप्त होते ज्यावेळी त्या शब्दाचा उच्चार अधिकारी व्यक्तिने केलेला असतो.
तीच वस्तुस्थिती वंदे मातरमची आहे. न्याय निष्ठूर बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी इंग्रजांच्या नोकरीत सर्व प्रकारचा त्रास भोगला, बदल्या स्विकारल्या, प्रकृतीची हेळसांड स्विकारली पण गोरा आहे म्हणून चुकीला माफी नाही केली. गो-यांचे लांगूलचालन केले नाही. जेवढा आनंदमठचा नायक ताठ तेवढेच बंकीमचंद्र चट्टोपाध्याय ताठ राहिले. फक्त ५६ वर्षाच्या आयुष्यात भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे सांस्कृतिक दूत बनले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणायला लो. टिळकांसारखे व्यक्तिमत्त्व असते, त्यावेळी ते शब्द मंत्र बनतात. होय हे हिंदू राष्ट्र आहे हे लक्षात येण्यासाठी डॉ हेडगेवार यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व त्या शब्दांमागे उभे लागते.
वंदे मातरम् या प्रेरणादायी शब्द व कवितेमागे बंकीमचंद्र चट्टोपाध्याय लागतात. वंदे मातरम् अभ्यासताना बंकीमचंद्र चट्टोपाध्याय ही अभ्यासलेच पाहिजेत तर वंदे मातरमची दाहकता कळणार.
सुनील देशपांडे.
Comments
Post a Comment