लाचित बडफुकन व शिवाजी महाराज

लाचित बडफुकन व शिवाजी महाराज 

आज २४ नोव्हेंबर रोजी आसामचे महा वैभव लाचित बडफुकन यांचा जन्मदिवस आहे. एकूण फक्त ५० वर्षाचे आयुष्य लाभलेले महान सेनानी यांचा जन्म १६२२ साली झाला व १६७२ साली त्यांचे जीवन उद्दिष्ट पूर्ण होऊन जीवन प्रवास संपला. आसाम जिंकण्याचे औरंगजेबाचे स्वप्न हे या महापुरुषामुळे कधीही पूर्ण होऊ शकले नाही. इस्लामी विकृतीचा छळ आसामला मुघल सल्तनीकडून होऊ शकला नाही कारण लाचित बडफुकन व त्यांच्या राष्ट्र प्रेरणा.
बडफुकन हे विजयी वीर आहेत एवढेच महत्व नाही तर इस्लामी विकृत विजयी वारु कधीही आसाम जिंकू शकला नाही. ओहम साम्राज्याचे लाचित बडफुकन हे राजा नव्हते तर सेनापती होते व शेवटच्या १६७१ च्या सराईघाट युध्दात आजारी असून लढाई लढले व जिंकले. गनिमीकाव्याने ब्रम्हपुत्रेतील लढाई लढले व संख्येने थोडे असूनही बलाढ्य औरंगजेब आरमाराचा पराभव केला.

पण याहूनही महत्वाची गोष्ट हिंदूंनी इतिहासातून अभिमानाने शिकली पाहिजे, व ताठ मानेने सांगितली पाहिजे ती आहे राष्ट्र एकात्म होते, शत्रूभाव समान होता व संस्कृती रक्षण ही राष्ट्र रक्षणाची गरज असते हे या कालखंडाने भारताला, हिंदू समाजाला शिकवले. 

ज्यावेळी लाचित बडफुकन आसाममधील ओहम हे हिंदू राष्ट्र यशस्वीपणे सुरक्षित ठेवत होते त्याच सुमारास लाचित बडफुकन यांच्या नंतर आठ वर्षांनी जन्माला आलेल्या छत्रपति शिवाजी महाराज हे आसाम पासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापत होते व तोच गनिमीकावा हा आधार घेऊन. ज्यावेळी दळणवळण साधने नसताना असाम असो वा महाराष्ट्र समान शत्रू भाव आपल्याला पाहिला मिळतो. अन्यथा असाम व महाराष्ट्राला समान शत्रू मित्र भाव कसा शिकवला गेला असेल. हा भाव शिकवला हिंदू संस्कृतीने. हीच आहे हे सांस्कृतिक राष्ट्र संक्लपना. आपला समान शत्रू कोण व का हे शिकण्यासाठी छत्रपति शिवाजी महाराज व लाचित बडफुकन यांना भेटण्याची गरज नव्हती.

शिव शंभूंचा द्वेष्टा, देव, मंदीर द्वेष्टा हा संस्कृति विध्वंसक म्हणून राष्ट्र विरोधक व त्यासाठी युध्द व फक्त युद्ध नाही तर विजयी युध्द कारण इस्लामला फक्त पराभूत करणे हेच त्या विचाराची विकृती नष्ट करते. म्हणून आधी युध्दात मरण पत्करणे मग पराभूत झालो तरी चालेल ही भूमिका बदलून दोनही महापुरुषांनी परस्पर न भेटताही, इस्लाम समजून घेतला व कौर्य व विकृतीसमोर फक्त हौतात्म्य नाही तर फक्त विजय हे उद्दिष्ट ठेवले व यशस्वी करून दाखवले.

हे स्मरण आज लाचित बडफुकन जन्मानिमित्याने भारताने केले पाहिजे. की या दोघांनी हजारो किलोमीटर दूरही समान विचार केला, समान शत्रुबोध समजून घेतला व आम्हाला हे एक राष्ट्र कधी नव्हतेच हे सांगायचा जो प्रयत्न केला गेले काही वर्षे चालू आहे, त्याना हे पुरातन सांस्कृतिक हिंदू राष्ट्र आहे हे समजावून सांगितले.

पराक्रम तर आहेच पण हे स्मरण त्याहुनही खूप जास्त महत्वाचे आहे.
सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन