इतिहास

इतिहास 

भारताचा इतिहास असाही समजून घेऊ यात. शीख नववे गुरु तेग बहाद्दूर यांचा हुतात्मा दिवस आज २५ नोव्हेंबरला आहे.  जन्म होता. १६२१ साली उत्तर भारतात. लाचित बडफुकन यांचा जन्म होता १६२२ साली. ते होते आसामचे म्हणजे पूर्व भारतातील. व छत्रपति शिवाजी महाराज यांचा जन्म १६३० सालचा. महाराष्ट्रातील. म्हणजे दक्षिण भारतातील.

तिघांमधील साम्य आहे औरंगजेब म्हणजे इस्लामच्या विकृत विचारधारे विरुद्ध संघर्ष. यातील दोन विरांनी तो तलवारीने केला तर गुरू तेग बहाद्दूर यांनी बलिदान करून. या तिघांच्या कार्य कर्तृत्वावर भरपूर विचार झाला आहे, अजूनही व्हायला पाहिजे व स्मरण तर सातत्याने केले पाहिजे.

पण एक गोष्ट जी शिकली पाहिजे जी आपल्याला शिकण्यापासून वंचित ठेवले होते, नव्हे ते आठवू नये असाच प्रयत्न होता, ते म्हणजे भारत एक सनातन सांस्कृतिक हिंदू राष्ट्र आहे व होते.

वरील तीनही महापुरुषांच्या महान कर्तृत्वाचा एकत्र विचार एकात्म सनातन राष्ट्र जीवनासाठी करायचा आहे. भारताच्या उत्तर, दक्षिण, पूर्व टोकावर असलेले, समकालीन, पण हजारो किलोमीटर दूर असूनही त्यांचा शत्रूबोध समान होता कारण हे राष्ट्र एक होते. भारताचे सुख दुःख समान होते, शत्रू मित्र भाव समान होते, अध्यात्मिक अवधारणा समान होत्या.

म्हणून लाचित बडफुकन औरंगजेबाशी विजयी झुंझले, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यच उभारले व काशी विश्वनाथ मंदिर तोडल्यावर भयंकर दुःख व्यक्त केले. तर गुरू तेग बहाद्दूर यांनी काश्मिरी हिंदूंच्या सक्तीच्या धर्मांतराविरुध्द जीवन बलिदान दिले. भारताने जगाला राष्ट्र ही सांस्कृतिक संक्लपना आहे हे शिकवले. 

म्हणून भारत राज्याशिवाय व राजाशिवायही राष्ट्र म्हणून जिवंत होते व आहे. गुरु तेग बहाद्दूर होते त्या जागेवर मुघल राज्य होते, छत्रपति शिवाजी महाराज होते त्या महाराष्ट्रातही तुर्की राजवट होती व लाचित बडफुकन यांनाही मुस्लिम सल्तनतीशी संघर्ष करावा लागला. कारण हिंदू मूल्याधारित सनातन राष्ट्र,  राज्य नसूनही जिवंत होते व त्या सांस्कृतिक मूल्यासाठी या तिघांनीही एकमेकांना न भेटताही समान शत्रुबोध समजून घेतला होता.

या तीनही महापुरुषांच्या इतिहासाचा हा अर्थ समजून घेणे आज अत्यावश्यक आहे.
सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

  1. हिंद दी चादर निमित्ताने माझा सांस्कृतिक राष्ट्र संक्लपने वरील लेख

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन