गोवा मुक्ती दिवस

आज १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा म्हणजे गोमांतक स्वतंत्र झाला. अनेक तरुण तरुणींना आश्चर्य वाटू शकते. की असे कसे? आपला भारत देश तर १५ आॅगस्ट १९४७ साली स्वतंत्र झाला होता ना? मग गोवा १९६१ साली?.

हा प्रश्न प्रत्येक भारतीय तरुण तरुणीला पडलाच पाहिजे? हा प्रश्न पडला तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात दुर्लक्षित पण सर्वात महत्त्वाच्या संक्लपने वर चर्चा होईल.

हा प्रश्न आहे राष्ट्रीयत्व म्हणजे काय? व भारतीय राष्ट्रीयत्व म्हणजे काय? भारत स्वतंत्र होत असताना देशभरातील ५०० च्या वर संस्थाने भारतीय संघराज्यात विना अट सहजपणे विलीन झाली. फक्त तीन संस्थानांचा प्रश्न डोकेदुखी ठरला.


एक होता हैद्राबादचा निजाम, दुसरा काश्मिरी हिंदू राजा पण बहुसंख्य प्रजा मुस्लिम व तिसरा गोवा ज्यावर शासन होते पोर्तुगीज म्हणजे धर्मांध ख्रिश्चनांचे. 

म्हणजे जेथे प्रजा हिंदू व राजा हिंदू होते, तेथे भारतात विलिनीकरण हे सर्वांसाठीच स्वाभाविक होते. पण हैद्राबादला प्रजा हिंदू तर राजा मुसलमान व काश्मीरला राजा हिंदू पण प्रजा मुसलमान होती. तरीही समस्या आली नसती, पण देश प्रमुखाला राष्ट्रीयत्वाची ओळख नव्हती ही समस्या होती. हैद्राबाद म्हणजे भाग्यनगर हा विषय सरदार पटेलांनी हाताळला पण बाकी दोनही विषय पंडीत नेहरुंच्या अखत्यारित होते व येथे राष्ट्रियत्वाची ओळख हा विषय महत्वाचा ठरला.

भारतीय राष्ट्रीयत्व हे सांस्कृतिक राष्ट्रियत्व आहे. येथे राज्ये कितीही असतील पण सर्वांच्या मनात राष्ट्रियत्व एकच होते. पण भारतीय राष्ट्रियत्वातील संस्कृती व धर्म दोन शब्द सोडल्या बरोबर काश्मिरी मुसलमान वेगळे ठरले व भारतीय राज्यकर्ते गोवा वेगळी संस्कृती म्हणजे ख्रिश्चन संस्कृती तेथे आहे असे मानत होते. म्हणून यांचे विलिनीकरण हे भारतीय राज्यकर्त्याला स्वतःलाच कसे करणार हा प्रश्न पडला. म्हणून गोमांतकाची हिंदू जनता भारत स्वतंत्र झाल्यानंतर १४ वर्षे वनवासात व अत्याचार सोशित जगत होती. कारण फक्त राज्यकर्त्याला राष्ट्रियत्वाची ओळख नव्हती अथवा गंगा जमना तहजिब नावाच्या मृगजळामागे धावत होता. आज गोमांतक स्वातंत्र्यावेळी आवर्जून हा प्रश्न पडू द्या. मग ३७० कलमाचे हटवले जाणे का आवश्यक होते हे पटेल.
योगी अरविंद, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, भगिनी निवेदिता, बंकीमचंद्र चट्टोपाध्याय बद्रीसहाय टुलधरिया व सर्व भारतीय का एकात्म भारत, सांस्कृतिक भारत याची मांडणी करत होते हे कळते. 
म्हणून २९ डिसेंबर ला एक छोटा भूभाग स्वतंत्र झाला नाही तर भारतीय राष्ट्रियत्वाची व्याख्या म्हणजे भारत हे एकसंघ सांस्कृतिक व सनातन राष्ट्र आहे हे सिद्ध झाले.
म्हणून खूप अभिमानाने हा दिवस साजरा करु या.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन