टि. बि. कुन्हा
Denationalisation of Goans या ग्रंथाचे लेखक व गोवा मुक्ती साठी आघाडीचा योध्दा म्हणजे टि. बी. कुन्हा.
पण स्वातंत्र्याची लढाई सर्वार्थाने जिंकायची असेल तर जी भूमि स्वतंत्र करायची आहे, त्याची संस्कृती, धर्म , तत्वज्ञान नीट आत्मसात असले पाहिजे व त्या मुळे निर्माण होणारा शत्रुबोधही नीट जाणता आला पाहिजे तर तो समाजच स्वातंत्र्य मिळवू शकतो. व भारताची ही ओळख गोव्याला सुध्दा आहे, हे सांगणारा देशभक्त म्हणजे टि. बि. कुन्हा.
तसे जन्माने कॅथोलिक ख्रिश्चन पण कर्माने चर्चच्या मते नास्तिक असल्याने व कायम स्वतः ची मूळे भारतियत्वात व सनातन राष्ट्र जिवनात शोधणारे असल्याने किंचितही पातळपण न आलेले राष्ट्रभक्त होते.
त्याहुनही महत्वाचे म्हणजे जन्माने मिळालेला पंथ कधीही परंपरेने मिळालेल्या संस्कृतीवर स्वार होऊ दिले नाही. म्हणून झेवियर कधीच त्यांच्या दृष्टीने संत होऊ शकला नाही. फक्त पोर्तुगीजच त्यांचे शत्रू नव्हते तर हे सनातन समाजाला बेहाल करणा-या ख्रिस्ती धर्म प्रचारकांचे कठोर विरोधक होते. कुन्हांचे मोठेपण हे आहे कि ख्रिस्ती पंथ प्रचारक व पोर्तुगाल राजसत्ता यांचे साटेलोटे त्यांनी नीट ओळखले होते व झेवियर हे पोर्तुगीज सत्ते एवढेच भयंकर आहेत हे त्यांनी उघडपणे मांडले व गोवा स्वतंत्र करण्यासाठी रणशिंग फुंकले.
सांस्कृतिक राष्ट्रवाद समजला नाही किंवा गोवा म्हणजे काहीतरी composit culture आहे असा भ्रम करून घेतला तर गोवा स्वतंत्र व्हायला १४ वर्षे अधिक जातात व पंथ जर संस्कृती व एतदेशीय धर्माविरुद्ध क्रुरतेने वागत असेल तर त्या पंथाचे कोणीही संत पदस्थ नाहीत व तो पंथ व ते राज्यकर्ते दोघेही देश विरोधीच अशी भूमिका घेतली तर पंथ निरपेक्षपणे देशभक्त जनता डोक्यावर घेते याचे उदाहरण म्हणजे टि बी कुन्हा व भारतीय हिंदू जनता व प्रामख्याने गोव्यातील हिंदू जनता होय.
पोर्तुगीज घालवायचे तर ख्रिश्चन चर्चचे कारनामेपण मोडून काढले पाहिजेत हे सांगणारा देशभक्त म्हणजे कुन्हा.
वैचारिक स्पष्टता म्हणजे कुन्हा व वैचारिक गोंधळ म्हणजे पं नेहरू यांच्यामध्ये गोव्याची स्वातंत्र्य चळवळ हेलकावत होती. शेवटी समुच्चय भारतीय हिंदू व कुन्हांसारखे स्वातंत्र्याची स्पष्टता असणारे गोवेकर एक झाले व गोवा भारतात विलिन झाले.
गोव्याचे स्वातंत्र्य हे राष्ट्रीयत्वाच्या संक्लपना स्पष्ट होण्यासाठीची एक परीक्षाच आहे.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment