गोवा मुक्ती उशिरा का?

मॅन्युअल इ सिल्व्हा हा गोव्याचा पोर्तुगीज सत्तेचा शेवटचा गव्हर्नर जनरल व भारतातील पोर्तुगीज सत्तेचा लष्कर प्रमुख होता. सालझार राजाची आज्ञा होती की मरे पर्यंत युद्ध कर. पण लढणे शक्य नसल्याने तो शरण आला. त्याचे सैनिकी व जहाजांचे मोठे नुकसान झाले. पण तो परत गेल्यावर राजाने त्याचे मानसन्मान काढून घेऊन त्याला विजनवासात पाठविले. व १९७४ ला राजसत्ता गेल्यावर त्याला त्याचे मानसन्मान परत मिळाले व १९७४ ला गोव्यात आल्यावर त्याचे जोरदार स्वागत झाले.

मॅन्युअल इ सिल्व्हा हा गोव्याचा पोर्तुगीज सत्तेचा शेवटचा गव्हर्नर जनरल व भारतातील पोर्तुगीज सत्तेचा लष्कर प्रमुख होता. सालझार राजाची आज्ञा होती की मरे पर्यंत युद्ध कर. पण लढणे शक्य नसल्याने तो शरण आला. त्याचे सैनिकी व जहाजांचे मोठे नुकसान झाले. पण तो परत गेल्यावर राजाने त्याचे मानसन्मान काढून घेऊन त्याला विजनवासात पाठविले. व १९७४ ला राजसत्ता गेल्यावर त्याला त्याचे मानसन्मान परत मिळाले व १९७४ ला गोव्यात आल्यावर त्याचे जोरदार स्वागत झाले.
अता विचार करु या देशाचे नेतृत्व कसे असावे लागते. तांत्रिकदृष्ट्या भारत व पोर्तुगाल यांचे ३६ तासाचे युध्द झाले व त्यात पार्तुगाल हरले म्हणजे सिल्व्हा हा युध्द कैदी होता पण साधी चौकशी नाही, तुरुंगवास नाही, छितु नाही,( जी थोडी अटक झाली त्याला कारण होते पोर्तुगाल च्या राजाने युध्द थांबवले नाही व अफ्रिकेतील १२०० भारतीय अटक करण्याचा प्रयत्न केला म्हणून) या उलट काही कारण नसताना पोर्तुगालमध्ये मात्र अपमान, पद गमावले, विजनवासात गेला.
भारतातील सामान्य जनतेने जे भोगले त्यासाठी कुणालाच शिक्षा नाही. का? अत्याचारांची चौकशी का नाही? 
कारण नेतृत्वाला आपपर भावच नव्हता. आमचे कोण? परके कोण? याचा काही अभ्यास नाही. चर्चचे सत्तेच्या आधाराने धार्मिक छळ याची खंत नाही. म्हणून पं नेहरू गोवा स्वतंत्र झाल्यानंतर प्रथम गोव्यात गेले त्यावेळी दोन देवळे, ओल्ड गोव्यातील अत्याचारी चर्चला भेट व एका पुलाची पायाभरणी केली. देवळाला भेट आवश्यक होती कारण ते कौर्याची शिकार होते पण चर्च जे inquisition ( धर्म न्यायालये) नावाखाली सामान्य जनतेला जाळून मारण्यापर्यंतच्या शिक्षा देत होते त्या चर्चला भेट देत होते. यातच पं नेहरु यांची स्वतःचे व्यक्तिमत्त्व ( म्हणजे शांतीदूत ही प्रतिमा)जपण्यासाठी राष्ट्रहिताला तिलांजली देण्याची भयावह खोड नीट लक्षात येते. १४ वर्ष भारतीय भूभाग परकीय सत्तेच्या टाचेखाली असताना, सामान्य माणसे लढत असताना, नेहरुंनी लष्कर घातले नाही पण शेवटी घालावेच लागले. गाढवही गेले व ब्रम्हचर्यही. तेच १९६२  साली चीन बाबत घडले. या बाबतीत म्हणजे स्वतः ची प्रतिमा जपण्यासाठी,आम्ही इतक्या टोकाचे विकृत होतो की पकडलेल्या चार पोर्तुगिज सैनिकांना नाईक नावाच्या कप्तानाने आपल्या सैनिकांकरवी बडवले कारण ते सैनिक नाईकांना तू नरकात जाशील असे म्हटले होते. तर आमच्याकडे जिनिव्हा करारानुसार नाईक यांना शिक्षा झाली. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार अशी अवस्था होती.

जर भारत हे सांस्कृतिक दृष्ट्या हिंदू राष्ट्र आहे हे समजले असते तर गोवा भारताचा अविभाज्य भाग आहे हे समजले असते व १९४७ ला सैन्य घालून देश स्वतंत्र झाला असता पण आमची प्रतिमा आमच्या देशापेक्षा मोठी ठरली व वैचारिक पंगूपण असल्याने गोवा १४ वर्षे गुलामी झेलत राहिला.
गोवा उशीरा स्वतंत्र झाला याची ही कारणमीमांसा आहे.
भारत सांस्कृतिक व सनातन राष्ट्र जीवन आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.
सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२


Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन