भगवान महावीर जयंती

आज भगवान महावीर जयंती साजरी होते आहे. कोणताही भारतीय पंथ सांगतो तसेच पण कालोचित विचार भगवान महावीरांनी जैन समाजाला म्हणून दिले. पण पंथ म्हणून दिलेले मार्गदर्शन असले तरी जैन हा भारतीय मातीत जन्मलेला पंथ असल्याने स्वाभाविक विचार हा एखाद्या समाज घटकासाठी न राहता पूर्ण मानवतेसाठीच आहे. व भारतात जन्मलेले प्रत्येक तत्वज्ञान हे हिंदू वैश्विक चिंतनच असते.

संपूर्ण जगाने जर संयमाने सहजीवन जगायचे असेल तर दुस-याच्या मताचा फक्त स्विकार करायचा असे नसून मताचा आदरही करायचा आहे तरच शांतततामय सहजीवन शक्य आहे हेच महावीरांनी सांगितले आहे.
सामान्यपणे अहिंसा, सत्य वचन, अपरिग्रह आत्मशोध क्षमाशिलता, जगा व जगू द्या अशी शिकवण आपल्या परिचयाची असते व ती अत्यावश्यक आहेच. पण त्या शिवाय काही महत्त्वाच्या शिकवणी महाविरांच्या आहेत. यातील एक आहे आनेकांतवाद. म्हणजे सत्य एकच असले तरी त्याला अनेक पैलू असतात व म्हणून प्रत्येकाच्या विचाराच्या वेगळेपणाचा सन्मान करा. हे मार्गदर्शन म्हणजेच हिंदू वैश्विक चिंतन आहे. वेगळेपणाचा आदर करा. वेगळेपण म्हणजे चूक नाही तर वेगळेपणाने तेच सत्य सांगितले आहे. हे जाणले की आपोआप समंजस व शांत सहजीवन जग जगू शकेल.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन