कार्यमग्नता जीवन व्हावे
कार्यमग्नता जीवन व्हावे
मृत्यू ही विश्रांती.
असं प्रत्यक्ष जीवन जगलेले व मृत्यू स्विकारलेले महान पुरातत्व शास्त्रज्ञ श्री हरिभाऊ वाकणकर यांचा आज स्मृतिदिन आहे. एका सरस्वती नदीवरील conference मध्ये सिंगापूर येथे पेपर वाचायला गेले असताना मृत्यूने त्यांना गाठले.
ध्येयधुंद शब्द अपुरा पडेल कारण ते आयुष्य ध्यैयवेड होत. ज्या शास्त्रज्ञांमुळे भारतीय पुरातत्व संशोधन हे जागतिक पुरातत्व विश्वात अद्वितीय ठरले त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे हरिभाऊ वाकणकर व भिमबेटका हे त्यांचे संशोधन क्षेत्र.
सर्व प्रथम महाकवी कालीदासांनी मेघदूत लेखन केलेली जागा हरिभाऊंनी निश्चित केली. व नंतर कुतूहुलाने, आधुनिक काळातही मानवी स्पर्शापासून दूर असलेल्या भीम बेटका या गुहांमधील शैलचित्रांचा शोध घेतला व भारत व भारतीय पुरातत्व शास्त्रज्ञ हे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त झाले. हे जागतिक महत्वाचे संशोधन करताना ते विद्या वाचस्पति( म्हणजे मराठीत P.hd.) नव्हते. या संशोधनावर त्यांनी डाॅक्टरेट केली. स्वतः चित्रकार असल्याने त्यांनी या चित्रांच्या प्रतिकृती बनवल्या. फक्त बटाटे खाऊन राहिले. पायी वणवण फिरले. मनुष्य स्पर्श नसलेल्या जंगलात ५० गुहा शोधल्या. शैवटी Unesco ने ती वारसा जागा ठरवली.
त्यांच्या संशोधनाचे महानपण ठरवण्याचा अधिकार मला नाही पण एका वेगळ्या पैलू कडे लक्ष वेधण्यासाठी वाकणकर हे मला शिडी सारखे उपयोगी पडत आहेत.
सध्या सर्वत्र चर्चा चालते की इंग्रजांनी भारतात बौध्दिक गुलामगिरी आणली, स्वत्व नष्ट केले, ओळख विसरायला लावली. पण हे आक्षेप किती तकलादू आहेत हे सांगणारे सर्वच क्षेत्रात अनेक दिपस्तंभ आहेत, त्यातील पुरातत्व क्षैत्रातील एक श्री हरिभाऊ वाकणकर होत.
आमची संशोधन वृत्ती, स्वत्व, स्वाभिमान, राष्ट्रभक्ती, स्वचा शोध सर्व काही जसेच्या तसे होते. त्यावर कोणतीही पुटे चढली नव्हती. सिंधू संस्कृती वर संशय काय घेतला जाईल की वाकणकरांनी सरस्वती शोध प्रक्लप राबवला व हिंदू संस्कृती ही सिंधुच काय? त्याहूनही पुरातन अशी सरस्वती संस्कृती आहे हे सिद्ध केले.
हजारो वर्षांच्या ज्ञानमार्गी संस्कृतीला १५०/२०० वर्षाचे पारतंत्र्य काही narratives आधारे गलितगात्र करतील का? याचे नाही हे उत्तर देणारी बौध्दिक कामगिरी म्हणजे भिम बेटका व सरस्वती शोध प्रक्लप आहे.
वाकणकर पुण्यतिथी निमित्त थोडे आत्मपरीक्षण करण्याची संधी साधू या.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment