हिंदू वर्तमान व भविष्य

हिंदू वर्तमान व भविष्य 

वर वर पहाता हिंदू  वर्तमान हे प्रतिक्रियावादी वाटते व काही प्रमाणात ते खरेही आहे. व असे अनेक प्रसंग उद्भवतात की हिंदू का प्रतिक्रिया देत नाही हा प्रश्न सुध्दा पडतो. कारण हिंदू जागरणाची एक सुनियोजित व संघटित रचना जी १०० वर्षांपासून सुरु झाली त्याला येणारी प्रार्थमिक स्वरुपात येणारी फळे ही वरकरणी प्रतिक्रियावादी वाटतात. पण खरे तर ते वातावरण हे हिंदू जागरणाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे स्वाभाविक परिणाम आहेत. केरळ पासून बंगाल पर्यंत व आसाम यातील दिसणारे राजकीय हुंकार हे याच जागरणाने आलेल्या आत्मभानाचे प्रतिक आहेत. व या जागरणाचा स्वाभाविक अंतिम परिणाम राजकीय असल्याने उथळपुथळ, गोंगाट, प्रतिघात, थोडा आक्रस्ताळेपणा हा जाणवत रहातो. पण त्याचवेळी या राजकीय गोंगाटात आनंदाने सहभागी झालेला हिंदू हा या मंथनातील ३७० कलम नाहिसे करण्यासारखे नवनीतही चाखत आहे. तीन तलाक निमित्ताने शरीयातील बारिक घुसखोरी करु शकत आहे. वक्फचे नखरे आडवू पहात आहे, NGO हे हिंदू विरोधी शस्त्र म्हणून वापरु दिले जाणार नाही हेही पहात आहे. जिहाद विरुद्ध उभा आहे.
पण त्याच बरोबर स्वतःच्या जबाबदारीची जाणीव ही या जागरणातून हिंदू ला आली आहे. योग दिवस हा जगभर स्वास्थ्याचा हिंदू दृष्टिकोन समजून सांगत आहे. व सरकारी प्रयत्नाने तो जागतिक दिन बनला आहे पण तो सर्वदूर प्रत्यक्षात मोठ्या संख्येने घडत आहे कारण जागृत हिंदू जगभर प्रयत्नपूर्वक हे जमिनीवर घडवून आणतो आहे. तर करोना महामारित तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती अशा उक्ति प्रमाणे लस शोधून ती धंदा म्हणून नाही जगाच्या शेवटच्या माणसाच्या स्वास्थ्यासाठी वापरली. शास्त्र व धंदा नाही तर शास्त्र व मानवता यांचा मिलाफ हा हिंदू जीवनदृष्टीकोन जगाला दिला.
हिंदू वर्तमान हे असे वास्तव आहे. 
जगभरात हिंदू आगदी थोड्या देशात नेतृत्व करताना शांत समंजस देश कसे वर्तन करतो याचा वस्तुपाठ देत आहेत तर जगभरातील हिंदू सेवा, समर्पणाने एक विश्वासु व जबाबदार समाज घटक म्हणून प्रतिमा उभी करत आहे.ह्या बरोबरच राष्ट्र म्हणून फक्त शक्तिच नाही तर आत्मसन्मान कसा संयमितपणे पण ठामपणे व्यक्त करता येतो हे Operation Sindoor वेळी जगाला दाखवून दिले.
हे हिंदू चे वर्तमान जगाच्या अपेक्षांमुळे व निहित कर्तव्य म्हणून कोणते भविष्य हाती घेणार आहे ते पुढे पाहू यात.


सर्व जगासाठी, चराचर विश्वासाठी हे हिंदू भविष्य, म्हणजे भविष्य काळ हा अपेक्षांनी भरलेला व भारलेला असणार आहे. या सर्व हिंदू भावविश्वाकडे जग भविष्यातील वाटचालीतील दीपस्तंभ म्हणून मोठ्या आशेने पहात आहे. सर्व जग निबिड अरण्यातील वाट शोधत आहे व त्यासाठी दीपस्तंभाचे काम हिंदू चिंतनाला करायचे आहे हे ते हिंदू साठी भविष्यकाल आहे. जग कुंठित व एकारलेल्या विचारांच्या निर्णायक पराभवामुळे भय कंपित झाले आहे. हे एकारलेले विचार कधी ख्रिश्चन म्हणून, कधी इस्लाम म्हणून व कधी कम्युनिझम म्हणून तारणहार म्हणून समोर आले व एकाहून एक जालिम विष असल्यासारखे जगाला डसून गेले अथवा डसत आहेत.
अशावेळी सर्व जगाला एक समंजस व सर्वसमावेशक, स्वयंसिध्द तत्वज्ञान किंवा मार्गदर्शनाची गरज वाढली आहे व ती पूर्ण करणे हे हिंदू भविष्य आहे. याची गरज येत आहे हे जाणलेल्या द्रष्ट्यापैकी एक म्हणजे स्वामी विवेकानंद. व त्यांचे या विषया संदर्भातील महत्त्वाचे भाष्य म्हणजे शिकागो धर्म परिषदेतील वैश्विक चिंतनावर आधारित आधुनिक परिभाषेत सांगितलेले हिंदू चिंतन आहे. हजारो वर्षांपासून भारतात ते धर्म,तत्वज्ञान, संस्कृती, संस्कार, हिंदू नर नारी व भारत देश  यांच्या माध्यमातून स्वयं सिध्द आहे. सह जीवनाची पूर्व अट ही विविधतेचा फक्त स्विकार नाही तर आदर हवा.  व सर्व मार्ग एकाच सत्याकडे जातात म्हणून सह अस्तित्व हवे. हा तो विचार. जो जगाला समजून घ्यायचा आहे व ते काम हिंदू धर्म, तत्वज्ञान, संस्कृती, संस्कार, हिंदू नर नारी व भारत देश यांना आगामी काही वर्षे करावे लागणार आहे. हे हिंदू चे भविष्य आहे.
सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन