पुस्तक, ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, शोध निबंध अशा पुस्तकाचे परिक्षण
An Illustrated Primer
Christianity Islam. Hindu
Religions
With Special Reference to Bharat
असे दणदणीत पण अभ्यासपूर्ण पुस्तकाचा परिचय करून देणे आवश्यक आहे. वर शिर्षकात म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक आहे पण त्याहून अधिक तो अभ्यासपूर्ण लिहिलेला ग्रंथ आहे. पण हे वर्णन ही पुस्तकाला पूर्ण न्याय देणारे नाही. कारण डाटा बेस पुस्तक असले तरी माहितीचे विश्लेषण अशा प्रकारे केले आहे की वाचकाला नवीन अर्थच सापडतो.
पुस्तक इंग्रजी व हिंदी मध्ये छापलेले आहे तरी मूळ लेखन इंग्रजी भाषेत आहे. पूर्ण २४० पानी असून ८ प्रकरणांमध्ये व १९ उप प्रकरणांमध्ये विभागलेले आहे. खरोखरच पायाभूत व रकाने, नकाशे, टेबल्स या आधारे चित्ररूप व वेधक बनले आहे.
हे पुस्तक माझ्या मते हिंदू समाज घटकासाठी लिहिलेले आहे व येथे हिंदू म्हणजे सनातनी, बौध्द, जैन, शिख हे सर्व मिळून आहेत. कारण हे पुस्तक वाचताना, अरेच्च्या, हे असे आहे, आरे बापरे, हे माहिती नव्हते, वाटल नव्हत एवढ भयंकर असेल, खरंच वाटत नाही, आकडेवारी तर भितीदायक आहे, आपलं भवितव्य काय असेल अजून १०० वर्षांनी अशा भावना फक्त हिंदू घटकांकडून येणार आहेत. मुस्लिम आणि ख्रिश्चन घटकांना हे सर्व माहिती असते. व हे पुस्तक अत्यंत स्पष्टपणे अब्राहिमिक व हिंदू विचार पध्दती यात दोन ध्रुवांचे अंतर आहे हे आकडेवारी व माहिती आधारे स्पष्ट करते.
पुस्तकाच्या अंतरंगात शिरण्यापूर्वी थोडे लेखकाविषयी लिहिणे आगत्याचे आहे. मिलिंद ओक हे तरुण विचारवंत ह्या पुस्तकाचे लेखक आहेत. इतके अभ्यासपूर्ण लेखन करण्यासाठी जी स्वस्थता व अभ्यासू वातावरण व सहकारी लागतात त्याची वानवा असतानाही त्यांनी हा सुंदर अत्यंत सखोल संशोधन करुन वस्तुनिष्ठपणे लिहिला आहे. लेखक चळवळीतील आहेत. सामान्य लोकांच्यात सतत वावरत असतात. तरीही रंग माझा वेगळा या भावनेने अभ्यासू वृत्ती या कोलाहलातही जपून ठेवली, एवढेच नाही तर हे पुस्तक सिद्ध करण्यासाठी ती प्रत्यक्षात व्यवहारात आणली. म्हणून मिलिंद ओक यांचे विशेष अभिनंदन व कौतुक सुध्दा. अनेक जण हा आरोप करु शकतात पण मी ही करणार आहे की सौभाग्यवश ते माझे मित्रही आहेत.
पूस्तकातील एक प्रकरण आहे They. हे प्रकरण या ग्रंथाच्या हेतूचा मुलाधार आहे. व या एका कारणानेही हा ग्रंथ शोध निबंध ठरतो. अब्राहामिक पंथ व भारतात जन्मलेले पंथ यात एकच मुख्य फरक आहे तो म्हणजे हा शब्द. They ( ते). अब्राहामिक पंथ हे exclusive आहेत. आम्ही आम्ही नसलेले ते. तर भारतीय पंथ inclusive आहेत. तेथे परकेपणा, मार्गांविषयी संशय, माझ बरोबर, तुझ चूक असे नाही. अब्राहामिक पंथाना They चे अस्तित्वच मान्य नाही. या सर्व गोष्टी या एका 'दे' मध्ये सामावलेल्या आहेत. हे एवढ्यासाठी विस्ताराने सांगितले की अशी ८ प्रकरणे या ग्रंथात आहेत. उत्सुकता ताणली असेल तर अंतरंगातील अन्य फार बारकावे येथे उघड करत नाही. पण एक नक्की सांगू शकतो की संपूर्ण पुस्तकात एकही unqualified statement नाही. प्रत्येक माहिती साठी, आकडेवारी साठी पुरावा दिलेला आहे व तो मूळ स्वरूपात शोधण्यासाठी QR code दिलेला आहे. एवढे स्वच्छ Transperant पुस्तक आहे म्हणून तो शोध निबंध आहे.
उप पंथ, राज्य देशावर त्यांचा प्रभाव, संघटनात्मक बांधणी, विचार पध्दती, आर्थिक रचना, पवित्र पुस्तके, मूलभूत धारणा हे सर्व काही या पुस्तकात आहे. यातील अब्राहामिक पंथांचा विचार करताना त्यांच्या अनुयायांच्या पध्दतीने विचार करुन ते समजून घेतले तर ज्यांना सामना करायचा असेल त्यांना शत्रुबोध मिळेल, जर ते पंथ वाट्याला आले तर जीवन कसे असेल हे समजेल. असे सर्व काही म्हणजे हे पुस्तक.
म्हणून प्रत्येक हिंदूने वाचले पाहिजे व व्यवहारात उपयोगात आणले पाहिजे. शेवटी उप संहार आहे. जिथे लेखक स्वतः मिलिंद ओक म्हणून डोकावतो. म्हणून २३९/२४० ही पाने जरुर वाचा.
पुस्तकास खूप शुभेच्छा.
सुनील देशपांडे
9420495132.
Comments
Post a Comment