अय्याप्पा हिंदू चिंतनातील सहजीवनाचा आविष्कार

अय्याप्पा
 हिंदू चिंतनातील सहजीवनाचा आविष्कार

 भारतीय पौराणिक कथा जीवनामध्ये अय्याप्पा स्वामींची जन्म कथा आहे. मस्तवाल बनलेल्या भस्मासुर स्वतः च्या आराध्याच्या मागे लागला व वर देऊन बसलेल्या भगवान शंकरांच्याच जिवावर उठला. त्यावेळी भगवान विष्णूंनी सौंदर्यवती मोहिनी रुप घेऊन भस्मासुराचा अंत केला. पण त्या सौंदर्यवती मोहिनीच्या रुपावर स्वतः शंकरही भाळले व स्वामी अय्यप्पांचा जन्म झाला. म्हणून स्वामी अय्यप्पांना हरीहरसूत असेही नाव पडले आहे.

कोणत्याही समाजातील पौराणिक कथा जेवढ्या वैविध्यपूर्ण, मनोवेधक व अर्थगाभी असतात तेवढे त्या समाजाचे तत्वज्ञान, चिंतन, दर्शने ही महान असतात. या बाबतीत हिंदू पुराणे तर वैविध्यपूर्णता मनोवेधक तर आहेतच पण अत्यंत अर्थपूर्णही व स्वतः मध्येच एक तत्वज्ञान आहेत.
म्हणून आज या कथेचा अर्थ समजून घेणे फारच अगत्याचे होते आहे.

संपूर्ण जग आज एकारलेपणाने युध्दजन्य परिस्थितीत सापडले आहे. अशावेळी ते अशा चिंतनाच्या शोधात आहे कि जे शांततामय, समंजस सहजीवनासाठी योग्य दिशा दर्शन करेल. व स्वाभाविकपणे स्वयंसिद्ध हिंदू तत्वज्ञानात कडे दीपस्तंभ म्हणून पहात आहेत. हिंदू धर्म, तत्वज्ञान, चिंतन, संस्कृती, संस्कार, हिंदू नर नारी, भारत देश यांच्याकडे या गंभीर व सर्व जगाला चिंतेने खात आहे अशा समस्येचे उत्तर आहे. सह अस्तित्वासाठी परस्पर विविधतेला सर्वांनीच स्विकारायचे आहे व एवढेच नव्हे तर त्याकडे आदराने पहायचे हा भाव आवश्यक आहे व तो भाव हिंदू शब्दात अध्याहृत आहे. व कालोचित सिध्द आहे.
या स्वामी अय्यप्पा पौराणिक कथेचे महात्म्य वरील सिध्दांत सिद्ध करते. शैव व वैष्णव दोन स्वतंत्र पंथ आहेत पण त्यातील दैवतांची एकात्मता किती खोलवर आहे. किती सखोल सहजीवन आहे. त्या स्वामी अय्यप्पांना पूजणारे दोघेही, शैव व वैष्णव हे एकच आदर व भक्तिभावाने तेथे येतात. विविधता अशी मान्य करा असे फक्त सांगून भागत नाही तर तसे समाजाच्या भावविश्वात ते मुरवावे लागते,जे भारतात हिंदू या दर्शनाने हिंदू नर नारी मध्ये हजारो वर्षांपासून रुजवले आहे.
आज पुन्हा सर्व जगासाठी ते आवश्यक बनले आहे व भारतीय समाजाने हे आव्हान स्विकारायचे आहे.
सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन