वारक-यांनो वैचारिक कडवटपणा स्विकारा

वारक-यांनो आपली ओळख हिंदू धर्म ही आहे. आणि कोणाही संतांनी ती नाकारली नाही. दलगत राजनितीमध्ये आकंठ बुडलेल्या सामाजिक नेतृत्वाने काही बाही वक्तव्य केली म्हणून विचलित होण्या एवढे स्वस्त बनू नका. वारीच्या १५ दिवसात जेवढे कठोर जीवन जगतो त्याहून अधिक वैचारिक कठोरता स्विकारु या. व स्वतःला व स्वतःच्या विठ्ठलाला या बुध्दिभ्रष्ट वैचारिक कालवाकालवीत उतरवू नको या. जेथे जेथे हिंदू संघटित होतो तेथे तेथे हितशत्रू उभे राहतात, लहान मोठ्या लढाया उत्पन्न करतात पण आपण त्यांना तिरस्कार दृष्टि टाकून निघुन जायचे आहे. अगदी हाती चले आपनी चाल पध्दतीने. माझ्या विठ्ठला विषयी आदर नाही, त्याचे अस्तित्व स्विकारत नाहीस तर या माळक-याला तू दिसत नाहीस. फक्त एवढेच उत्तर आहे. हे झाले त्यांच्या विषयी.
एकांनी सांगितले जे खळांची व्यंकटी सांडो व एकांनी सांगितले नाठाळाचे माथी.

पण आमचे काय? आम्हाला माऊली, तुकाराम महाराज कसे समजले आहेत? नामदेव महाराज दूर देशात आयुष्यभर का राहिले? पंढरपूरच्या विठोबाचा विरह इतके वर्ष का सोसला? भारत एक आहे हे सांस्कृतिक मार्गाने सांगण्यासाठी गेले ना? त्या वारकरी संप्रदायाने स्थानिक राजकारणासाठी ज्यांचा जीव जातो त्यांच्या आरोपांकडे, जातीभेदाकडे पहात बसायचे की हिंदू धर्म रक्षणासाठी टाळाची तलवार व छातीचा कोट करायचा. 
आज नामदेवांना आठवायचे जी पंजाबी भाषा कळत नाही त्या भाषेतील धर्मग्रंथ श्री गुरु ग्रंथसाहेबामध्ये नामदेवांच्या शिकवणीचे जागा प्राप्त केली आहे. ही वारीची ताकद आहे व वारकरी संप्रदायाची राष्ट्रीय दृष्टी. ज्यांना हिंदू म्हटलं की फक्त जात आठवते त्यांनी हिंदू नामदेवांची जात आठवत बसावे उरलेल्यांनी राष्ट्रव्यापी नामदेव महाराजांना पुजावे. हा कडवटपणा स्विकारण्याची वेळ आली आहे.
म्हणून आपल्या संप्रदायातील माऊली व तुकाराम महाराज पुन्हा आठवू या.
 जे खळांची व्यंकटी सांडो असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते लक्षात घेऊ. हे आज जे महाराष्ट्रातील टाकाऊ नेतृत्व आहे त्यासाठीची शब्द रचना आहे. जेंव्हा यांच्या बुध्दितील हा मळ जाईल तेंव्हा यांचा विचार करु या. यांच्या राजकारणाच्या गलिच्छ खेळीसाठी आमचे आदर्श व दैवत यांना दावणीला बांधु देऊ नका? ज्यांनी आमच्या संप्रदायाचे मार्गदर्शन केले ते निवडणुकीच्या राजकारणासाठी नाही तर सांस्कृतिक भारताच्या स्वातंत्र्यासाठी व भविष्यासाठी.
आमच्या तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितले नाठाळाचे माथी हाणू काठी. माझ्या विठ्ठलावर संशय घेणार, त्याच्या दर्शनाला जाणार नाही पण वारकरी संप्रदायावर अविश्वास दाखवायला पुढे? नाही चालणार. तुकोबारायांनी सांगितले आहे की त्यांचे काय करायचे. नाठाळ ओळखून काठी हणायची आहे व ज्यावेळी हे नाठाळ ठीक होतील त्यावेळी मग 
भलेचिया देऊ कासेची लंगोटी.
मग देऊ 
जो जे वांछिल तो ते लाहो.
पण आधी नाही.
विठ्ठल दर्शनाने घायाळ झालास तर आम्हा वारक-यांना, आमच्या संप्रदायाला काहीही सल्ला दे, जरुर ऐकू. 
पण फक्त स्वतःच्या फायद्यासाठी माझा विठ्ठल नाकारशील व तरीही मलाच शहाणपण शिकवशील तर समजून रहा की त्यांच ज्ञानोबा तुकाराम महाराजांनी आम्हाला वैचारिक कडवटपणा पण शिकवला आहे.
आमच्या वारीत घोळ घालणा-यांनो सावधान.
वारकरी हा हिंदू धर्माचा जागृत वैचारिक धारकरी आहे.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन