वटपौर्णिमा आणि आम्ही हिंदू

हिंदू समाजाची एक खोड आहे. कुणीतरी समाजातील दोष दाखवला तर आम्ही स्वतः हून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे रहातो व स्वतःच्या सात पिढ्यांचा उद्धार करतो.
 आज वटपौर्णिमा आहे. ज्यांना हिंदू समाजात कवडीची किंमत नाही तेच फक्त, मराठीमध्ये ज्याला फेमिनिझम म्हणतात, त्या नावाने उगाचच गळा काढतात व आम्ही आरोपित हिंदू हा सण कसा पर्यावरण पूरक आहे याचे दाखले देत बसतो.
मी हिंदू म्हणून व मुलगा, भाऊ, नवरा, बाप व सासरा अशा अनेक नात्यांनी स्त्रियांच्या भावविश्वाशी असलेल्या नात्याने काही स्पष्ट बोलणार आहे. 
वट पौर्णिमा वडाचे महत्व सांगते पण त्यासाठी ती पूजा नाही तर ते स्त्री महात्म्य सांगते म्हणून महत्वाची आहे. त्यामुळे हिंदू समाज ज्यांना हिंग लावून विचारत नाही अशांच्या, मग पुरषांनी पण का नाही पूजा करायची असल्या कोल्हेकुईला उत्तर व. देत बसणार नाही. 
हिंदू कुटुंब रचना ही सर्वस्वी त्यागावर उभी आहे व त्या त्यागाच्या केंद्र स्थानी हिंदू स्त्री आहे. मुलगी, बहिण, बायको, म्हणून भावजय, नणंद, आई, आजी अशी अनेक बिरुदे ती संभाळते. व या जबाबदाऱ्या जर आनंदाने सांभाळायच्या असतील तर त्याग या एकाच गुणाने ते शक्य आहे. व म्हणूनच तिच्या त्यागा भोवती सर्व हिंदू कुटुंब रचना उभी आहे. Me too आंदोलनात मुख्य मुद्दा त्याग का करायचा? हाच असतो. पण म्हणूनचं हिंदू समाज Me too म्हणतच नाही. 
उलट घरपण संभाळणे व ते संभाळून घरासाठी बाहेरही भरारी घेताना दिसते. जबाबदारी स्विकारते, हक्काच्या नावाखाली कुटुंब रचना उधळत नाही. व उथळपणे page Three ला follow करत नाही. ती ज्ञानमार्गी रहाते व कुटुंबालाही तसेच बनवते.
यात यातायात करते, कष्ट करते पण व्यवस्थेवर रागवत नाही. हे सगळ मी नाकारते असा अक्रोश करत नाही कारण तिला हे माहिती आहे फक्त हिंदू नव्हे तर सर्व जगालाच कुटुंब रचनेच्या आधारेच सुखी, संयमित पण शांत जीवन जगायचे आहे.
व म्हणूनच कुटुंबातील प्रमुख पद ती त्यागाच्या शक्तितून मिळवते व त्याचे प्रतिक स्वरूप म्हणजे वटपौर्णिमा. ते दास्याचे नसून त्यागाचे प्रतिक आहे.
 हे सर्व कळणारी हिंदू कुटुंब रचना व स्त्री म्हणूनच नाळ तुटलेल्या समंधांना दाद देत नाही व कुटुंब नायिका म्हणून मनोभावे हा सण साजरा करते वडा भोवतीचा दोरा कुटुंबाला त्यागाच्या धाग्याने धरुन ठेवतो.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन