गुरु हरबिंदरसिंग साहिब यांची जयंती

३० जुनला गुरु हरबिंदरसिंग साहिब यांचा जन्मदिवस आहे. गुरुजी हे शीख संप्रदायाचे सहावे गुरु. वडील व पाचवे शीख गुरु अर्जन सिंगजी यांच्या अमर बलिदानानंतर अवघ्या ११ व्या वर्षी गुरुपदी विराजमान झाले. गुरु अर्जन सिंगजी यांचे बलिदान अर्थातच इस्लामी आक्रांतांच्या विकृत अत्याचाराशी संघर्ष करताना झाला होता. संघर्ष म्हणजे बलिदान. अशा पार्श्वभूमीवर गुरू हरबिंदर साहिब हे या पदावर विराजमान झाले. यांचा कालावधी होता इसवी सन १५९५ ते १६४४. अवघे ४९ वर्षांचे आयुष्य होते. पण शिख संप्रदायातील सर्वात महत्वाच्या बदलाचे ते कर्ते होते. संप्रदायाने संघर्ष करण्यासाठी सिध्द झाल्याचे व त्याचे नेतृत्व पंथ प्रमुखाने करण्याचे भारतीय पंथ इतिहासातील ते तसे पहिलेच उदाहरण असावे.
ज्यावेळी हिंदू वैश्विक चिंतन आपण अभ्यासत असतो कि जे वैविध्य फक्त स्विकारत नाहीत तर विविधता आदराने स्विकारते, त्यात तलवार कशी येऊ शकते? सह अस्तित्व हाच ध्यास असलेल्या चिंतनात पंथ तलवार कशी उचलू शकतो? अशी दुविधा मनात निर्माण होऊ शकते. किंवा तसा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो?. हाच प्रश्न हिंदू वैश्विक सहजीवन, शांततामय सहजीवन सांगत असताना हिंदू देव देवता शस्त्र सज्ज कशा? उपस्थित केला जातो.
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गुरु हरबिंदरसिंग साहिब यांचे जीवन व कृती समज घेणे गरजेचे आहे. गुरुजी या पदावर अवघ्या वयाच्या ११ वर्षी गुरु हरबिंदरसिंग साहिब का आले? या प्रश्नाच्या उत्तरात आहे. शिखांचे पाचवे गुरु अर्जन सिंगजी यांना बलिदान का करावे लागले? एक असे क्रुर व असहिष्णू तत्वज्ञान दिल्लीत सत्ताधिश होते की त्यांना कोणाही अन्य विचाराचे, तत्वज्ञानाचे, धर्म मार्गाचे अस्तित्वच मान्य नव्हते व फक्त अमान्यच नव्हते तर त्यांना अस्तित्वात राहाण्याचा अधिकारच मान्य नव्हता. व म्हणूनच अर्जन सिंगजी गुरुंना बलिदान द्यावे लागले. व गुरू हरबिंदर साहिब यांना लक्षात आले की सत्य व शांततामय सहजीवनाच्या तत्वज्ञानाला व्यवहारात सिध्द करायचे असेल तर अन्यायासमोर फक्त बलिदान देऊन चालणार नाही तर या वैश्विक चिंतनाला न्यायाची जोड दिलीच पाहिजे. व हे पहिले शिख गुरु झाले ज्यांच्या कडे दोन तलवारी होत्या मिरी आणि पिरी. एक भौतिकता सांगत होती तर एक आध्यात्म. त्यांनी समाजाला अन्यायाविरुद्ध उभे राहण्यास सांगितले व आपण जे अकाल तख्त पहातो याची सुवर्णमंदीरासमोरची निर्मिती ही गुरु हरबिंदरसिंग साहिब यांनी केली. 
क्रुर औरंगजेब नव्हता तर इस्लाम क्रूर आहे. कारण ग्वालियरच्या तुरुंगात गुरु हरबिंदरसिंग साहिब यांना पकडून ठेवले होते ते जहांगिरांनी. गुरुजींनी स्वतःची सुटका करुन घेतलीच पण त्याबरोबरच ५० हून अधिक हिंदू राजांची सुटकाही करवून आणली. बंदी छोर असे याला म्हटले जाते.व शस्त्र सज्ज शिख संप्रदाय हा धर्म शास्त्रासह न्यायासाठी संघर्षशीलही बनला.
यासाठीच हिंदू देव देवता शस्त्र सज्ज आहेत. त्यासाठी भगवत गीतेचे वैश्विक चिंतन व विविधतेचे आदरपूर्वक स्वागत करणारे तत्वज्ञान हे प्रत्यक्ष युद्धभूमीवर, सांगितले गेले. धर्म तत्वासाठी प्रत्यक्ष युध्दसुध्दा योग्य असे प्रत्यक्ष भगवंतांनीच सांगितले. तेच सूत्र सर्व विश्वासाठी पसायदान मागणा-या ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितले की जो जे वांछिल तो ते लाहो हे होईल पण कधी ज्यावेळी 'जे खळांची व्यंकटी सांडो ' असे होईल, द्रुष्टपणा संपेल तेंव्हाच हे जो जे वांछिल तो ते लाहो हे अस्तित्वात येईल.
म्हणूनच सर्व जगाला जे सह अस्तित्व जगायचे आहे व त्यासाठी विविधतेविषयी आदर भाव कसा जोपासायचा आहे? हे हिंदू धर्म, हिंदू तत्त्वज्ञान,हिंदू संस्कृती, हिंदू संस्कार, हिंदू नर नारी व भारत या कडून शिकायचे आहे त्यात ही न्यायाची पूर्व अट आहे.
गुरु हरबिंदरसिंग साहिब यांनी हे कृतीने सिध्द केले की शांती, समता, गुरु भक्ती ही परिपूर्ण व्हायची असेल तर अन्याय, कौर्य, एकारलेले तत्वज्ञान यांचा सर्वंकष पराभव करावाच लागेल. ही वैश्विक सहजीवनासाठी पूर्व अट आहे. म्हणूनच गुरु हरबिंदरसिंग साहिब यांचे स्मरण अधिकच महत्वाचे ठरते. 
हिंदू धर्माने जगाला जी सहजीवनाची गुरुकिल्ली आगामी काळात द्यायची आहे ती फक्त चांगुलपणाच्या भाबड्या विश्वासावर नाही तर एकारलेली तत्वज्ञाने, क्रौर्य, विकृती यांचा बिमोड करत द्यावयाची आहे.
गुरु हरबिंदरसिंग साहिब यांचे जयंती निमित्त याचे पुन्हा एकदा स्मरण करु यात.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन